हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयानं आणि कॉमिक टायमिंगनं सगळ्यांना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेडमिलवर धावताना राजू याना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माहितीनुसार त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे.
#BreakingNews | Comedian & actor #RajuSrivastava, 59, suffered a heart attack while working out at a gym in #NewDelhi today pic.twitter.com/ldMcbTZpDg
— Mirror Now (@MirrorNow) August 10, 2022
राजू श्रीवास्तव यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी आणि त्यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना व्यायाम करताना सौम्य हृदय विकाराचा झटका आला आणि म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक आहे आणि ते शुद्धीत आहेत.’ राजू श्रीवास्तव यांच्या टीमने इंडियन एक्स्प्रेसला या घटनेची पुष्टी केली आहे. ट्रेडमिलवर धावत असताना अचानक आलेल्या चक्करमुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे न कळल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं.
राजू श्रीवास्तव हे केवळ विनोदी कलाकार म्हणून नव्हे तर उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रसिद्ध कॉमिक रिऍलिटी शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेज’मधून ते प्रकाश झोतात आले. राजू याना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच चाहते चिंतेत पडले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजु श्रीवास्तव उपचार घेत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते शुद्धीत आले आहेत.
Discussion about this post