Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता भारत गणेशपुरे यांना मातृशोक; वृद्धापकाळाने झाले आईचे निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 9, 2023
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Bharat GaneshPure
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील कॉमिक अभिनेता भारत गणेशपुरे गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून भारत गणेशपुरे प्रकाश झोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचे वसले. या कार्यक्रमातून विविध भूमिका साकारून त्यांनी लोकांना खळखळून हसवले. मात्र सर्वाना हसवणाऱ्या या कलाकारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या आईचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिग्गज विनोदी कलाकार भारत गणेशपुरे याना मातृशोक झाल्याने संपून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज गुरुवार, दिनांक ९ मार्च २०२३ रोजी भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन झाले आहे. भारत यांच्या आईचे नाव श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे असे आहे. भारत यांची आई त्यांच्या अमरावतीमधील घरी राहत होत्या. भारत यांचे बंधू मनीषदेखील येथेच राहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bharat Ganeshpure (@bharatganeshpure_official)

आज पहाटे आई मनोरमाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने गणेशपुरे कुटुंब असह्य दुःखात आहे. सूत्रांनुसार आज गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राहत्या घरातून रहाटगाव स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा संध्याकाळी ५ च्या सुमारास निघणार आहे.

जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc

— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023

आज सकाळी बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. सतीश यांचे जिगरी मित्र आणि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी हि दुःखद माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सतीश कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले असतानाच त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान गाडीत असतानाच त्यांना तीव्र हार्ट अटॅक आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, आजच सतीश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: Bharat GaneshpureChala Hawa Yeu Dya Famedeath newsmarathi actor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group