हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आणि बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत असलेल्या कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्याची अत्यंत हृदय द्रावक बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात अत्यंत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे निधन बॉलिवूडची मोठा धक्का असून अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांनी एक्झिट घेत मनोरंजन चाहत्यांना हादरा दिला आहे.
Comedian Raju Srivastava passes away in Delhi at the age of 58, confirms his family.
He was admitted to AIIMS Delhi on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym.
(File Pic) pic.twitter.com/kJqPvOskb5
— ANI (@ANI) September 21, 2022
काही दिवसांपूर्वी जिममध्ये व्यायाम करत असताना भोवळ येऊन ते पडले. दरम्यान ट्रेड मिलवर धावत असताना त्यांना अचानक हदयविकाराचा झटका आल्याने निदान झाले. यावेळी त्यांना उपचारासाठी दिल्लीतील नामांकित रुग्णालय एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते. विशेष डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अखेर त्यांनी अँजिओग्राफी करायला हवी असा निर्णय घेण्यात आला. यांनतर राजू यांनी क्लिनिकल उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही अशी सूत्रांनी माहिती दिली. अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीविषयी विविध अफवा पसरविल्या गेल्या. पण आता अफवांच्याही पलीकडे ते गेले आहेत. राजू यांच्या निधनाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजू श्रीवास्तव यांनी लाफ्टर क्लबच्या माध्यमातून प्रेक्षकांना लोटपोट करून हसवलं आणि आपली अशी एक विशेष जागा निर्माण केली. त्यांचा हा प्रवास अत्यंत जिद्दीचा आणि प्रेरणादायी आहे. यामुळे मनोरंजन सृष्टीसाठी त्यांचे नसणे हि बाब अत्यंत वेदनादायी ठरते आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून टाहो फोडत आहेत. तसेच त्यांच्या निधनाची बातमी पसरताच लाखो चाहत्यांनी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. ‘राजु एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते’ अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Discussion about this post