हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 94वा अकॅडमी पुरस्कार सोहळा Oscars 2022 २७ मार्च २०२२ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाला यावेळी सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. त्यानंतर ‘ड्युन’ला १०, बेलफास्ट आणि वेस्ट साईड स्टोरीला ७ अशी नामांकनं मिळाली होती. विल स्मिथच्या किंग रिचर्ड या चित्रपटाला ६ नामांकनं मिळाली होती. जगभरात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणी आपल्या नावे हे पुरस्कार केले ते जाणून घेऊया एकाचवेळी. जाणून घ्या पूर्ण यादी :-
Congratulations to this year's winners! Here's the full list: https://t.co/d45NWXsvvp
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, किंग रिचर्ड
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- नो टाइम टू डाय, नो टाइम टू डाय बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी दिलं संगीत
- सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल
- सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले- शियान हेडर
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- केनेथ ब्रनाघ लिखित बेलफास्ट
- सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर- ड्राइव्ह माय कार
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर- एन्कँटो
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- हान्स झिमर, ड्युन
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ड्युन
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन, पॉल लॅम्बर्ट, त्रिस्टान माइल्स, ब्रियान कॉनर, गर्ड नेफ्झर
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ड्युन
- सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस
- सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- द आइज ऑफ टॅमी फाये, लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम, जस्टीन राले
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट- द लाँग गुडबाय
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट- द विंडशिल्ड पायपर
- सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल
Discussion about this post