हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता. यांचे चित्रपट महाराष्ट्रात पदर्शित होऊ दाणार नाही, तसेच त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा देणारे नाना पटोले यांनी आता सफाई दिली आहे. ते म्हणाले, आपण अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही. तर त्यांच्या कामाच्या विरोधात आहोत. मात्र, सफाई देतानाच पटोले यांनी या दोन्ही अभिनेत्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन हे खरे हिरो नाहीत. असते तर ते संकटाच्या काळात सामान्य जनतेसोभत उभे राहिले असते, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.”
आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील अथवा ते दिसतील, तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाही मार्गावर चालू. आम्ही ‘गोडसे वाले’ नाही तर ‘गांधी वाले’ आहोत,” असेही पटोले म्हणाले.
यापूर्वी नक्की काय म्हणाले होते नाना पटोले? –
“काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का आहेत ? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?” असा सवाल नाना पटोले यांनी केला होता.
Discussion about this post