हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादी समाजाच्या बुद्धीहून वेगळी अशी कलाकृती प्रसिद्ध व्हायची असेल तर त्यावर वाद पेटणं अत्यंत साहजिक आहे. कारण त्या कथानकासह समाजाचे नियम पटवून घेत नाहीत. अशावेळी या कलाकृतीचे कौतुक होत नाही तर त्यावर टीका केल्या जातात. अशीच एक कलाकृती घेऊन दाक्षिणात्य दिग्दर्शक पा रणजिथ अण्णा प्रेक्षकांसमोर येत आहेत. या कलाकृतीचे नाव ‘धम्मम’ असे आहे. पण या कलाकृतीचे दुर्दैव म्हणजे काही प्रेक्षक याचे स्वागत करण्यात उत्सुक नाहीत. तर विरोध करण्यात धन्यता मानत आहेत. पण सुदैव असेही कि, दुसरीकडे एक दुसरा गट या चित्रपटाचे आणि त्यातील कथेतील विचारांचे समर्थन करीत आहे. असे दोन वेगवेगळे मतप्रवाह या चित्रपटबाबत पाहायला मिळत आहेत.
‘धम्मम’ हा एक लघुपट आहे आणि याचा टिझर अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या कलाकृतीमध्ये दिग्दर्शकाने एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जो व्यापकपणे समोर येण्याऐवजी त्याच्याविरोधात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पा रणजिथ दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर या वादाचे कारण बनत आहे. यातून भगवान बुद्धांप्रति चुकीचा संदेश दिला जातोय असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. आपण या व्हिडिओत पाहू शकता कि, एक लहान मुलगी यामध्ये बुद्धांच्या खांद्यावर उभी राहून आकाशाकडे पाहत उंच उडण्याची स्वप्न पाहत आहे. ज्यावर तिचे वडील तिला देवावर काय चढ़तेस.. वेडी आहेस का..? असे विचारतात. तर ती सांगते बुद्धांनी सांगिलंय ते देव नाही मग तुम्ही त्यांना देव का म्हणता..? यावर नेटकरी संतापले आहेत आणि टीका करत आहेत.
तर काही नेटकरी समर्थनार्थ बोलत आहेत कि, या कथेचं बुद्धांची मूळ शिकवण सांगितली आहे. तर एकाने म्हटलंय कि, नव्हे देव मी नव्हे मोक्षदाता तथागत म्हणे मी आहे मार्गदाता. बुद्धांनी देवाचे अस्तित्व नाकारले आणि तुम्ही त्यांनाच देव बनवण्याच्या मार्गावर चालत आहात. बुद्धांनी देव ही संकल्पना नाकारली त्यांनी स्वतः सांगितलं की मी मार्गदाता आहे.
खरंतर या कथानकात एका शाळकरी मुलीचे भावविश्व रेखाटण्यात आले आहे. यात तिचा संघर्ष, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असे सारासार विचार करायला लावणारे प्रभावी कथानक निर्माण करण्यात आले आहे. हे सगळं काही एका कथेत सेट करण्याचं काम दिग्दर्शक पा रणजिथ यांनी केले आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना समीक्षक म्हणाले कि, ती मुलगी पाण्यातील माशाला ‘मी काही तुला इजा करणार नाही. मात्र तुझी जर हरकत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी तुला घेऊन जाईल’ असे म्हणताना दिसते हा प्रसंग मार्मिक आहे. मासा या चित्रपटात अतिशय वेगळ्या अर्थाने वापरला आहे. जे प्रभावी आहे. आजचं माणसाचं जग, समाज, बुद्धी आणि आव्हानं या कथनात उत्कृष्टपणे मांडले आहेत.
Discussion about this post