Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोनामुक्त गोविंदाने त्याच्या स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पहा हा भन्नाट व्हिडीओ.

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
govinda
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा नुकताच कोरोना मुक्त झाला आहे. त्याचे प्रवक्ते पारुल चावला यांनी निवेदन जारी करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. मात्र आता स्वतः गोविंदाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप आनंदात दिसत आहे. आपली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती गोविंदाने या व्हिडीओ पोस्टसोबत दिली आहे. त्याने या बुमरँग व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अपुन आ गएला है।’ गोविंदाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने १९८० च्या दशकात नायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे ९० च्या दशकात स्वत:ची विनोदी अभिनेता म्हणून त्याने वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या ‘मर्डर’, ‘जीते है शान से’ आणि ‘हम’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले नाव कमावले. १९९२ साली त्याने ‘शोला और शबनम’ या रोमँटिक चित्रपटात तरूण एनसीसी कॅडेटची भूमिका साकारली होती. तसे पाहता गोविंदा आजकाल चित्रपटांपासून दूर आहे. मात्र आजही चाहत्यांच्या मनावर तो राज्य करितो. तसेच सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करून, तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

रविवारी गोविंदाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले होते की, ‘सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही श्री. गोविंदा आहुजा यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांच्यात काही लक्षणे दिसत आहेत आणि त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. श्रीमती सुनीता आहुजा सर्वांना विनंती करू इच्छितात की, मागील काही दिवसांत त्यांच्या अर्थात गोविंदाच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. भारत आणि परदेशातील चाहते, कुटुंब आणि मित्र यांच्या आशीर्वादाची सध्या गरज आहे.’

Tags: bollywood actorcovid19govindaInstagram PostSunita AhujaTrending Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group