Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणवीरच्या ‘सर्कस’मध्ये दीपिकाचा जलवा; हटके डान्सने दिला चाहत्यांना करंट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Current Laga Re
0
SHARES
102
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘सर्कस’ लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाले आहेत. अलीकडेच ‘सर्कस’चा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मिडियावर तो चांगलाच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरून शर्मा, जॉनी लिवर, सिद्धार्थ जाधवच्या कॉमेडीचा तडकासुद्धा पहायला मिळणार आहे. पण खास सरप्राईज तर दीपिकाने दिलं आहे. या चित्रपटात ‘करंट लगा रे’ या गाण्यात तिची खास एंट्री आहे. त्यामुळे यागाण्यावर दिपवीर थिरकताना दिसले आहेत.

‘करंट लगा रे’ गाण्यातील दीपिकाचा हटके लूक सगळ्यांना आवडतोय. हे नवं गाणं नुकतंच रिलीज झालं असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्याला रिलीज होऊन तासभर झाला असेल आणि इतक्यातच नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं या गाण्याची चर्चा होती. यानंतर अखेर ‘करंट लगा रे’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे पूर्ण गाणे ती सीरिजच्या युट्युब चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय गाण्याचा टीझर आणि पूर्ण गाणे अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. या गाण्यातला दीपिकाचा अंदाज खरोखरच करंट लावणारा आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाची स्टाईल, तिची स्माईल आणि या गाण्यातला तिचा डान्स म्हणजे मनोरंजनाचा धमाकाच.. या गाण्यामध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे. या गाण्याच्या तालावर तिने धरलेला ठेका कुणालाही थिरकायला लावेल असाच आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्स मूव्ह्सला विशेष पसंती मिळत आहे. मुख्य म्हणजे मोठ्या गॅपनंतर दीपिका आणि रणवीर एकत्र मोठया पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांचे आणि त्यांच्या चाहत्यांचे उदंड प्रेम मिळणार यात काही शंकाच नाही.

Tags: Bollywood Upcoming MovieCirkusDeepika PadukoneNew Song Releaseranveer singhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group