हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी ३ हा रिऍलिटी शो आता अंतिम टप्प्याच्या हळूहळू जवळ येत आहे. गेल्या आठवड्यात मीरा जगन्नाथ, मीनल शाह, सोनाली पाटील, विकास पाटील आणि संतोष चौधरी अर्थात दादूस हे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यापैकी मीनल, विकास व सोनाली तिघंही सेफ झाले आणि दादूस व मीरा डेंजर झोनमध्ये आले. त्यामुळे यांच्यातील नेमका कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. यानंतर आता घरात फक्त ८ सदस्य उरलेत. कारण काल घरातून सगळ्यांचे आवडते दादूस अर्थात संतोष चौधरी घराबाहेर झाले. दादूसला चाहत्यांनी सर्वात कमी मतं दिल्यामुळे दादूस घरातून बाहेर पडले. दादूसच्या एव्हिक्शनमुळे घरातील सर्व भावुक झाले.
बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात दादूसची इच्छाशक्ती पाहून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. पण यानंतर त्यांचा गेम चुकीच्या दिशेला वळतोय असे प्रेक्षकांना जाणवू लागले. टीम ए मध्ये गेल्यापासून त्यांचा खेळ पूर्ण बिघडला आणि परिणामी ते अनेकदा ट्रोलही झाले. अखेर ‘बिग बॉसच्या घरातील दादूसचा प्रवास संपला आणि ते घरातून बाहेर झाले. यानंतर अगदी महेश मांजरेकर यांनाही दादूसचा खेळ खराब झाल्यामुळे ते बाहेर पडले याची खंत जाणवली.
दादूस यांचे मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच त्यांना गायनाची आवड होती. म्हणून शाळेच्या स्नेह संमेलनामधून ते गायन, निवेदन, नकला, अभिनय असे सर्व प्रकारात सहभागी व्हायचे. दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. यामुळे देवीच्या जागरणातून दादूशी गाणी सादर करू लागले. या गाण्यांना आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. दादूस यांनी कोणतंही शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेता आगरी कोळी लोकसंगीताला जिवंत ठेवले. बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीते गाणारे दादूस आज बिग बॉसच्या मंचावरून घरी गेले पण प्रेक्षकांच्या मनावर कायमचा छाप उमटवून गेले. दादूस बॉलिवूड संगीतकार बप्पी लहिरी याना आदर्श मनात असल्यामुळे त्यांचा पेहराव अगदी बप्पी दा त्यांच्यासारखाच असायचा. म्हणून मराठीतील बप्पी लहिरी अशी दादूसची ओळख निर्माण झाली.
Discussion about this post