हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडिया, थिएटर आणि बॉक्स ऑफिस सगळीकडे डॅडींची दहशत आहे. कारण मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित तसेच चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिस गाजवतोय. दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाने बक्कळ कामातील सुरुवात केली आहे. काय ते डायलॉग.. काय ती ऍक्शन.. काय ती गाणी.. सगळं कसं एकदम ओक्केमधी आहे. म्हणूनच चित्रपटाने आतापर्यंत २.४० कोटी इतका गल्ला अगदी सहज केला आहे.
‘दगडी चाळ २’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. ‘दगडी चाळ’ या चित्रपटानंतर तब्बल ७ वर्षांनी त्याचा पुढील भाग ‘दगडी चाळ २’ रिलीज झाला आहे. त्यामुळे आधीपासून उत्सुक प्रेक्षकांची तिकीट खरेदीसाठी झुंबड उडताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या मॉर्निंग शो साठी ८.४२%, आफ्टरनून शो साठी ७.४६%, इव्हिनिंग शो साठी ९.९१% आणि नाईट शो साठी १०.०८% इतकी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. चित्रपटातील प्रत्येक डायलॉग, पात्रांची एंट्री यावर प्रेक्षक अक्षरशः टाळ्या शिट्या वाजवताना दिसत आहेत.
सध्या हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीन्सवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत थक्क करणारा आहे. मुख्य म्हणजे दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने चांगली कामे केली आहे.
० ‘दगडी चाळ 2’ ची चार दिवसातली कमाई –
शुक्रवार – ०.५२ लाख रुपये
शनिवार – ०.७० लाख रुपये
रविवार – ०.८३ लाख रुपये
सोमवार – ०.३५ लाख रुपये
एकूण- जवळपास २.४० कोटी रुपये
याविषयी बोलताना निर्मात्या संगीता अहिर म्हणाल्या कि, ‘प्रेक्षक आणि समिक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. ‘दगडी चाळ’ प्रमाणेच ‘दगडी चाळ 2’ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचं चीज झाल्याचं वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे.’
Discussion about this post