हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या लाडक्या ‘झी मराठी’वर लवकरच एक डान्सिंग रिऍलिटी शो येतो आहे. ज्याचं नाव आहे ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’. हा शो खास लहान मुलांसाठी असणार आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे त्याचे विविध लक्षवेढी प्रोमो. मुलांचे लक्ष ओढून घेणारी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकातली चिंचि चेटकीण या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. चिंचि चेटकीण अर्थात अभिनेता वैभव मांगले आपल्या कामात चोख असल्यामुळे कमालीचे छोटे डान्सर येणार यात काही वादच नाही. पण या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार..?असा प्रश्न सर्वानाच होता. ज्याचं उत्तर आहे गश्मीर महाजनी. होय या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर गश्मीर महाजनी दिसणार आहे.
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा डान्सिंग रिऍलिटी शो येत्या २७ जुलै २०२२ पासून सुरु होत आहे. झी मराठीवर आठवड्यातून दोनदा म्हणजे बुधवार आणि गुरुवार रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी हा शो प्रसारित होणार आहे. याचे प्रोमो सुरु झाल्यापासून छोट्या आणि मोठ्या वयोगटातील सगळ्याच प्रेक्षकांना शो कधी सुरु होणार याची उत्सुकता लागली आहे. शिवाय आता स्वतः गश्मीर महाजनी या कार्क्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे हि बातमी ऐकून तर त्याचेही चाहते उत्साहात न्हाहून निघाले आहेत. कारण अभिनयासोबत तो एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे आपण सारेच जाणतो.
आपल्या या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना गश्मीरने सांगितले कि, ‘हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे. ज्यामध्ये मी सहभागी होतोय आणि ते हि परीक्षकाच्या भूमिकेत. मला याचा खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे, लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्यासोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन. प्रेक्षकांनी आतापर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलंय. एका अभिनेत्यापलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मला अनेकदा मला विचारणा व्हायची कि, मी डान्सशी निगडित काही करणार आहे का..?
तर हो आता ती वेळ आली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पहायची ती आता पूर्ण होईल. कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये.’ २७ जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.
Discussion about this post