हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर ‘सबसे कातिल’ म्हणून प्रसिद्ध असणारी आणि लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते. कधी लावणीवरील वाद, तर कधी कार्यक्रमातील चेंगरा चेंगरी. काही ना काही कारणामुळे गौतमी पाटील हि सतत चर्चेत आहेच. सर्वत्र गौतमीच्या कृतीवर निषेध नोंदविला जात असताना तिच्या चाहत्यांसाठी मात्र मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलला चित्रपटाची ऑफर आली होती. यानंतर आता चित्रपटाचे नाव समोर आले आहे. म्हणजेच लवकरच आता गौतमी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करतानाचा गौतमीचा एक व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे खरंतर गौतमी पाटील प्रकाश झोतात आली. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॅन्स आहेत
. गौतमीचा कार्यक्रम आहे म्हटलं कि अख्ख गाव झाडून येतं. याचा प्रत्यय तिच्या अनेक कार्यक्रमातून आला आहे. मुख्य म्हणजे लावणी या लोककलेच्या नावाखाली अश्लिल हावभाव करणे, विभत्स चाळे करणे यावरून अनेक लावणी कलाकारांनी गौतमीला झापले होते. एव्हढे असूनही आता गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार आहे हि फारच मोठी गोष्ट आहे.
माहितीनुसार, दिलफेक अदाकारीने तरुणांना वेड लावणारी गौतमी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे तिने स्वतःच सांगितले आहे. गौतमीच्या पहिल्या वहिल्या आगामी चित्रपटाचे नाव ‘घुंगरु’ असे आहे. आपल्या चित्रपटाविषयी गौतमीने चाहत्यांना आवाहन करीत म्हटले आहे कि, ‘माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा’.
Discussion about this post