Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या सख्ख्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून मात्र अकस्मात मृत्यूची नोंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Bhagyashree Mote_Madhu Markandeya
0
SHARES
856
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधू मोटे- मार्कंडेय हिचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान तिच्या शरीरावर मारल्याच्या काही खुणा स्पष्ट दिसून आल्यामुळे तिचा मृत्यू होण्यामागे काही वेगळे कारण असण्याचा संशय बळावला आहे. याबाबत सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहिण मधु मोटेचा मृतदेह पुण्यातील वाकड या ठिकाणी आढळून आला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास सुरु करताच तिची ओळख पातळी आणि या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला गेला. या घटनेने मोटे कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेला बहिणीच्या मृत्यूचा जबर धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत बहिणीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

भाग्यश्रीने बहिणीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘माझ्या प्रिय बहिणीचा या जगाला निरोप! माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि काय नाही..? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू..? तुझ्याशिवाय जगणं तू मला कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. मी कधीच करणार नाही. कधीच नाही’.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

सुत्रांनुसार, मधु मोटे- मार्केंडेय या त्यांच्या एका मैत्रीणीसोबत वाकडमध्ये केकचा बिझनेस करत होत्या. रविवारी मधु त्यांच्या मैत्रीणीसोबत दिसल्या होत्या. त्या भाडेकरारावर घर घेण्यासाठी चौकशी करत होत्या. दरम्यान मधूला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली आणि दातखिळी बसल्याने मैत्रिणीने ती काढण्याचा प्रयत्न केला. मधूला तिच्या मैत्रिणीने तातडीने खासगी रुग्णालयात नेले मात्र तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जा असे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच फेब्रुवारीत तिच्या पतीचेही निधन झाले होते. कुटुंबियांकडून संशय व्यक्त केला जात असताना वाकड पोलिसांनी मात्र तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नाही असं सांगितलं असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

Tags: bhagyashree Motedeath newsEmotional Post ViralMurder Or SuicidePuneviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group