Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पत्राद्वारे खान पिता- पुत्राला जीवे मारण्याची धमकी; भाईजानच्या घरी पोलीस दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Salim Khan
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आणि चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या पिता-पुत्राला एका प[पत्राच्या माध्यमातून हि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, अशी माहिती मिळतेत. यामुळे सध्या संपूर्ण सिनेइंडस्ट्रीसह अन्य स्तरांवर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता पोलीस सलमानच्या बांद्रा स्थित घरी दाखल झाले आहेत.

Maharashtra | Actor Salman Khan & his father Salim Khan received a threat letter, today. Bandra Police has filed an FIR against an unknown person & further probe is underway: Mumbai Police

(File pic) pic.twitter.com/wAKZlgHNH2

— ANI (@ANI) June 5, 2022

खात्रीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचे पिता सलीम खान हे नित्यनियमानुसार सकाळी जॉगिंगला गेले होते. दरम्यान एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले असता त्या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलेलं होतं. यामध्ये स्पष्ट लिहिलेलं कि, सलमान खान आणि सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली त्याप्रमाणे मारण्यात येईल. यानंतर सलीम खान यांच्या पायाखालील जमीन सरकली. सलमान खानचं बांद्रास्थित घर गॅलॅक्सी आणि ज्या ठिकाणी हे धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून आतापर्यंत जे कोणी संशयित व्यक्ती सापडतील त्यांना बोलावून चौकशी केली जात आहे.

Maharashtra Home Department strengthens actor Salman Khan's security after a threat letter was sent to him and his father Salim Khan yesterday, June 5.

(file pic) pic.twitter.com/lwFpDh0rpj

— ANI (@ANI) June 6, 2022

गेल्या महिन्यात रविवारी २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला गोळ्या घालून त्याच्या शरीराची चाळण करीत त्याची हत्या करण्यात आली. पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गायक सिद्धू मुसेवालावर हल्लेखोरांनी हल्ला चढविला आणि या हल्ल्यात ३० राउंड फायर करीत त्याची हत्या करण्यात आली. अगदी काहीच दिवसांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. ज्याने याआधी सलमान खानला जीवे मारण्याची खुली धमकी दिली होती. त्यामुळे आता सलमान आणि त्याच्या वडिलांना मिळालेल्या धमकीच्या पत्राकडे पोलीस गांभीर्याने पाहत आहेत आणि या धमकीचा कसून तपास केला जात आहे. शिवाय खान कुटुंबियांच्या सुरक्षिततेतदेखील वाढ करण्यात आली आहे.

Tags: ANIBollywood CelebrityDeath Threatssalim khanSalman Khantwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group