हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा झगमगत तारा अभिनेता अंकुश चौधरी म्हजे उत्साहाचं एक पूर्ण पॅकेज आहे. या उत्साही आणि लोकप्रिय अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. अहा..फक्त वाढदिवस नाही हा.. तर लग्नाचा वाढदिवससुद्धा आहे. यानिमित्त त्याची पत्नी आणि मराठी अभिनेत्री दीप परब चौधरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अंकुशसोबतचे २ फोटो शेअर केले आहेत आणि सोबतचं एक सुंदर असं रोमँटिक कॅप्शनदेखील लिहिले आहे.
अंकुशची पत्नी दीपाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पतीसोबतचे खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. प्रत्येक वर्ष जात असताना, मी तुझ्या आणखी प्रेमात पडते. माझ्या बाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट तू आहेस. जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपल्या बायकोला साथ देणारा धीरगंभीर पती असल्याबद्दल धन्यवाद! मी तुझ्यावर खूप प्रेम करते’. दीपाच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र मंडळी यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.
अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब चौधरी यांच्या लग्नाला आज १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अंकुश आणि दीप यांनी २००७ साली एकमेकांचा हात साताजन्मासाठी धरला. त्यांना एक मुलगा आहे. ज्याचं नाव प्रिन्स असं आहे. अंकुश आणि दीपा यांचा प्रेमविवाह झाला होता आणि हे प्रेम कॉलेजमध्ये जुळलं होत. याचा खुलासा स्वतः अंकुशने चला हवा येऊ द्या च्या मंचावर केला होता. सध्या अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चर्चेत आहे. तसेच दीपाची झी मराठीवर ‘तू चाल पुढं’ हि मालिका सुरु आहे आणि चांगली लोकप्रिय ठरते आहे.
Discussion about this post