हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी १५ ऑगस्ट रोजी यंदाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला गेला. यंदाचे वर्ष खास असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले होते. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. या मोहिमेत प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेतील सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलीया यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सोशल मीडिया ट्विटरवर तिरंग्यासोबत फोटो शेअर केला आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण एक मोठी चूक केली आणि त्यामुळे ट्रोलर्स त्यांना धारेवर धरताना दिसत आहेत.
अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी अधिकृत सोशल मीडिया ट्विटरवर एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी हातात झेंडा पकडत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका यांनी पांढरा शुभ्र कुर्ता आणि पलाझो पॅंट परिधान केले आहे आणि त्यांच्या हातात भारताचा तिरंगा दिसतो आहे. दीपिका यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘७५ व्या स्वातंत्र्यादिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.’ हि पोस्ट त्यांनी PMO अर्थात पंतप्रधानांना टॅग केली आहे. पण…, भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या. होय. दीपिका यांनी चुकून हि पोस्ट भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग न करता पाकिस्तान पंतप्रधानांच्या ट्वीटर हॅंडलला टॅग केली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली.
https://twitter.com/ChikhliaDipika/status/1559051513783361537
हि पोस्ट आणि त्यावरील टॅग पाहून नेटकरी त्यांना अख्खा दिवस हेच सांगत आहेत कि त्यांचं टॅगिंग चुकलं आहे. दीपिका यांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १० वाजून ३७ मिनिटांनी हा फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे. तेव्हापासून नेटकरी टॅगिंग चुकल्याचे सांगत आहेत. यानंतर बऱ्याच तासानंतर दीपिका यांनी हे ट्विट डिलीट केले. पण तोपर्यंत ट्रोलर्सने त्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे दिसून आले.
यावर एका नेटकऱ्याने डोळे बंद करुन निशाणेबाजी करतात त्या व्यक्तीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘पीएमचं ट्वीटर हॅंडल शोधताना’. तर दुसऱ्या एकाने लिहिलंय कि, ‘मित्रा रिलॅक्स. पाकिस्तान देखील भारताचाच एक भाग होता’. याशिवाय आणखी एकाने लक्ष्मणचा फोटो शेअर करत लिहिलंय कि, ‘हे प्रभू, मला ही काहीतरी मायावी शक्ती आहे असं वाटत आहे’. एकंदरच काय तर दीपिका ट्रोल होण्याच्या मार्गावर मार्गस्थ झाल्या आहेत.
Discussion about this post