हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या अभिनयासह आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. याशिवाय जेव्हापासून ती मिसेस रणवीर सिंग झाली आहे तेव्हापासून तर ती आणि रणवीर दोघेही कितीतरी वेळा आपल्या नात्यामुळे चर्चेत राहिले आहेत. शिवाय ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळॆ त्यांचा चाहतावर्गही फार मोठा आहे. नेहमीच हटके अंदाजात दिसणारी दीपिका यावेळी मात्र अत्यंत सुंदर अशा पारंपरिक वेशात दिसून आली आहे. हे फोटो ती आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली तेव्हाचे आहेत असे समोर आले आहे. यावेळी ती संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. याचे कारणही विशेष आहे.
दीपिका जितकी आपल्या अभिनयात अव्वल आहे तितकीच कुटुंबाच्या परंपरा राखण्यातही ती नेहमी पुढे असते. शुक्रवारी दीपिकाचे वडील आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा ६७वा वाढदिवस झाला. यादिवसानिमित्त संपूर्ण पदुकोण कुटुंब आंध्रातील तिरुपती बालाजी म्हणजेच भगवान व्यंकटेश्वर मंदिरात देवाच्या चरणी लीन झाले. यावेळी दीपिकासोबत तिचे आई-वडील आणि बहीण अनिशा असा संपूर्ण पदुकोण परिवार उपस्थित होता. दरम्यान दीपिकाचे मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी तिने फिकट गुलाबी लखनवी सूट आणि रेशमी शाल अंगावर घेतली होती. ही शाल दीपिकाला मंदिराकडून आशीर्वाद म्हणून मिळाली आहे. संपूर्ण पदुकोण कुटुंबाचा मंदिर प्रशासनाने यावेळी सन्मान केला. अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांना मानाचे अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप १९८० मध्ये जिंकली होती. हि बॅडमिंटन स्पर्धा जगातील सर्वात जुनी स्पर्धा आहे. यानंतर आता दीपिका तिच्या स्वतःच्याच वडिलांच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपटात काम करत आहे.
Discussion about this post