हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे लाडके विनोदी कलाकार सतिश कौशिक हे गुरुवारी जगाचा निरोप घेत अनंतात विलीन झाले. बॉलीवूडच्या विविध सिनेमांतून विविध भूमिका साकारत आपली एक छाप सोडणारे सतीश कौशिक कुणाच्या आठवणीत पप्पू पेजर म्हणून राहिले.. तर कुणाच्या आठवणीत कॅलेंडर म्हणून राहिले. त्यांनी साकारलेला मुत्थुस्वामी सारखा दोस्त आणि चंदा मामा सारखा मामा प्रत्येकाला आयुष्यात हवाहवासा वाटतो. त्यांचा प्रत्येक रोल आयकॉनिक होता.
अशा त्यांनी दिलेल्या खूप साऱ्या गोड आठवणींचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी सतिश कौशिक यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली तर प्रत्येकाने वाहिली पण हे ट्विट पाहिल्यानंतर सतीश कौशिक यांच्या भूमिका डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत.
Kunj Bihari, kya baat thi tumhari!
You will always remain an unforgettable 'Page'r in the Calendar.Rest in peace, #SatishKaushik ji. pic.twitter.com/RzMy0lr7Um
— Delhi Police (@DelhiPolice) March 9, 2023
दिल्ली पोलिसांनी सतीश कौशिक यांच्या आठवणीत शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘कुंज बिहारी, क्या बात थी तुम्हारी.. तुम्ही नेहमीच आमच्या कॅलेंडरमध्ये पेजर बनून कायम स्मरणात रहाल. रेस्ट इन पीस सतिश कौशिकजी’. सोबतच सतिश कौशिक यांच्या भूमिकेचा एक फोटो या ट्वीटमध्ये शेअर करत त्यावर लिहिलं आहे, ‘सुनिए तो सही.. थोडा रुकिये तो सही..’. हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या पोस्टवर अनेक नेटकरी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
माहितीनुसार, अभिनेते सतिश कौशिक यांची तब्येत बिघडली तेव्हा ते बिजवासन येथील फार्महाऊसवर होते. त्यांच्या मनॅजरने सांगितलं की, ‘१२.१० च्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला म्हणून त्यांना गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये ज्याण्यापूर्वीच त्यांना गाडीत हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा समजले कि सतीश यांनी प्राण सोडला आहे. ते दिल्लीहून आले होते म्हणून सर्वप्रथम दिल्ली पोलिसांना याविषयी सूचित करण्यात आले आणि घटनेचा तपास सुरु झाला. दरम्यान पोलिसांनी सतिश कौशिक यांच्या मृत्यूमागे काही कट तर नाही ना याचा तपास सुरु केला असून बुधवारी पूर्ण दिवसांत त्यांच्यासोबत काय घडलं याची माहिती पोलीस मिळवीत आहेत.
Discussion about this post