Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खिलाडी इज बॅक! गुडघ्याला दुखापत असूनही अक्षय कुमार परतला कामावर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 28, 2023
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshay Kumar
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटातील त्याच्या वाटणीला आलेले स्टंट नेहमीच स्वतः करतो. सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं शूट सुरु आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाली होती. या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये सुरू आहे. एक अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना अक्षयच्या गुडघ्याला जबर मार बसल्याने तो जखमी झाला होता. अद्याप त्याचं दुखणं काही थांबलेलं नाही मात्र असे असूनही तो शुटिंगवर परतल्याचे दिसले आहे. नुसता परतला नाही तर त्याने शूटसुद्धा केलं आणि हे पाहून नेटकऱ्यांनी त्याच कौतुक केलं आहे.

"Bade miyan aka @akshaykumar sir injured his knee while shooting for an action sequence today. It is not a very serious injury for now and he got braces on his knee. He continues to shoot for his close up scenes so schedule is on track".- @htcity

— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) March 23, 2023

एक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचे बरेच अ‍ॅक्शन सीन आहेत. यापैकी एकाचे शूटिंग सुरू असताना अक्षय कुमारला स्टंट करताना दुखापत झाली होती. यावेळी अक्षयच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले. अक्षय कुमारला झालेल्या दुखापतीमुळे स्कॉटलँडमधील शूटिंग वेळापत्रकात बदल करणे अपेक्षित होते. मात्र हे शूट वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षयने दुखापत होऊनही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे स्कॉटलँडमधील या सीन्ससाठी प्रोडक्शनचे १५ कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि म्हणून अक्षयने आराम न करता शुटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

An exclusive shot of Akshay Kumar giving his best on Bade Miyan Chote Miyan set even after suffering a knee injury. A true Khiladi 💪🏼🔥 #akshaykumar #tigershroff #bademiyanchotemiyan #onset #khiladi #khiladikumar #akshaykumarfans pic.twitter.com/Ga83nK768Z

— Pinkvilla (@pinkvilla) March 27, 2023

यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार बाईकवरून उतरताना दिसतो आहे. इथे त्याच्या मदतीसाठी टायगर श्रॉफ आणि क्रूपैकी काही सदस्य दिसत आहेत. अक्षयने दुखापत झाल्यानंतरही शूटिंग बंद न करता चित्रपटातील पुढचे सीन्स चित्रीत केले आहेत. त्यापैकी एक सीन शूट झाल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. अक्षय कुमारच्या गुडघ्याला दुखापत झाली असली तरीही तिचे स्वरूप गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचे शूट थांबवण्यात आले आहे. मात्र चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेचे अन्य सीन्स शेड्युलनुसार शूट करण्यात येत आहेत. अक्षयचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सोबतच त्याच्या खिलाडीपंतीचे कौतुक देखील करत आहेत. एकाने तर ‘याला खरा खिलाडी म्हणतात’ असेही म्हटले आहे.

Tags: akshay kumarBade Miyan Chote MiyanInjured During ShootTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group