हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं जन्माला आल्यापासूनच सेलिब्रिटी म्हणून ओळखली जातात. शेवटी सेलिब्रिटी किड्स असतात ना.. बॉलिवूडच्या बड्या बड्या दिग्गज कलाकारांची मुलं अशीच सिने इंडस्ट्रीत हिट झाली आहेत. आता हा मुद्दा सर्वश्रुत आहे त्यामुळे तो नकोच. पण अनेकदा आपण या सेलिब्रिटी किड्सना त्यांच्या मर्यादा ओलांडताना पाहिले असेल. ज्यामध्ये सैफ- करीनाचा तैमूर नंबर एक वर आहे. सोशल मीडियावर अनेकदा या स्टार किड्सचा बोलबाला असतो. असाच आज आणखी एका स्टारचा लेक चर्चेत आहे. विमानतळावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा आरव याला थांबविले गेले. हा व्हिडिओ पाहून अनेकांना व्हीआयपी असूनही याला कसं अडवलं..? असा प्रश्न पडला आहे.
बॉलिवूड स्टार्ससारखं त्यांच्या मुलांचंही आयुष्य एकदम झगमगाटीचं असतं. अनेकदा स्टार किड्स मनोरंजन सृष्टीत नसूनही चर्चेत असतात आणि यांच्यापैकी एक आहे अक्षय कुमारचा लेक आरव. यामुळे सोशल मीडियावर आरवचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी आरवने दिलेली प्रतिक्रिया लोकांना भावली आहे. त्याच झालं असं कि, आरव सध्या युकेमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे सुट्टी मिळते तास तो अधून मधून आपल्या कुटुंबीयांना भेटायला मुंबईत येतो. नुकताच तो मुंबईच्या विमानतळावर दिसला. हातात जॅकेट घेऊन तो घाईघाईने आत जात होता. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला गेटपाशी थांबवलं आणि त्याच्याकडे आयडी मागितला.
बॉलिवूड कलाकार किंवा त्यांच्या मुलांना व्हीआयपी एंट्री असते आणि त्यामुळे सहसा त्यांना अडवले जात नाही. पण आरवच्या बाबतीत उलटं झालं हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं. क्षणभर सगळ्यांना वाटलं कि बाकीच्या व्हीआयपीसारखं आता हा चिडेल. पण तसं झालं नाही. सुरक्षारक्षकांनी आरवला गेटपाशी थांबवलं आणि त्याची कागदपत्र मागितली.
आवश्यक ती सगळी कागदपत्रे आरवने सुरक्षारक्षकांकडे सुपूर्त केली. कागदपत्रे तपासल्यानंतर आरवला गेटमधून आत सोडले गेले. पण ही कागदपत्र तपासण्यासाठी वेळ लागल्याने आरवला तिथे काही वेळ थांबावे लागले. असे असतानाही आरव शांतपणे सुरक्षा रक्षकांना त्यांचे काम करण्यास सहकार्य करत होता. हे पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Discussion about this post