हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रेक्षकांचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या सुरक्षेच्या चौकटीत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचे वारंवार समोर आले आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येण्याचे सत्र हे विविध माध्यमातून अद्याप सुरूच आहे. त्यात कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानच्या जीवाला अधिक धोका असल्याचे स्पष्ट आहे. अलीकडेच अगदी तारखेची घोषणा करत सलमान खानचा जीव घेणार असल्याचा धमकीचा मेल थेट पोलिसांना पाठवण्यात आला होता. यानंतर यंत्रणा आणखीच सक्रिय झाली. तसेच या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमानच्या सुरक्षेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जे सर्वत्र चर्चेत आहे.
सलमान नुकतंच ‘आप की अदालत’मध्ये सहभागी झालेला. यावेळी भारत आणि दुबईमधील त्याच्या सुरक्षेविषयी मत प्रदर्शन केलं. रजत शर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीत सलमानने म्हटले, ‘मला कितीही धमक्या आल्या तरीही दुबईत सुरक्षित वाटते. मात्र भारतामध्ये थोडी समस्या आहे’, असे सलमान या मुलाखतीत म्हणाला होता. सलमानच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठे विधान केले आहे. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कि, सलमान खानला देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्यामुळे त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरण्यासाठी हरकत नाही. मला वाटतं कि मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही’. फडणवीस यांचे सलमान खानच्या सुरक्षेबाबतचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
दरम्यान सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना सलमान खानने सांगितले कि, ‘मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचे ते होणार आहे. मला वाटते देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचे असा नाही. आता माझ्याभोवती खूप सारे शेरा आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की, कधी कधी मलाच भीती वाटते. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने मला जे काही सांगितले जात आहे, त्या सर्व गोष्टींचे मी पालन करत आहे. माझ्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यानुसार तुम्हाला १०० वेळा भाग्यवान असावे लागते. पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचे आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे’.
Discussion about this post