Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैनाच्या घरी लक्ष्मीचे आगमन; चाहत्यांसह शेअर केला बाबा झाल्याचा आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mohit Raina
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवों के देव महादेव’ या लोकप्रिय मालिकेत महादेवाची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना हा छोट्या पडद्यावरील अत्यंत प्रसिद्ध चेहरा आहे. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत त्याने जगाच्या पित्याची भूमिका साकारली आणि आता खऱ्या खुऱ्या आयुष्यात तो बाबाची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहितची पत्नी अदितीने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. त्यामुळे मोहित आता एका मुलीचा बाबा झाला आहे. मोहितने सोशल मीडियावर पत्नीसह लेकीचा चिमुकला हात हातात घेतलेला फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mohit Raina (@merainna)

गेल्या जानेवारी महिन्यात मोहितने अदिती शर्मासोबत लग्न झाल्याची घोषणा करत त्याच्या सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम हॅंडलवर काही फोटो शेअर केले होते. यानंतर काही महिन्यांतच मोहित आणि अदिती यांच्या घटस्फोटाची अफवादेखील उडाली होती. पण डिसेंबरमध्ये मोहितने स्वतः घटस्फोटाच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. यानंतर आता मोहित आणि अदिती यांच्या आयुष्यात गोड परीच आगमन झालं आहे. रैना कुटुंबात लक्ष्मीच्या पावलाने मोहितची लेक जन्माला आली आहे. मोहितने आपण बाबा झाल्याचा आनंद आपल्या चाहत्यांसह शेअर करताना एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mohit Raina (@merainna)

अभिनेता मोहित रैना याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘… आणि आम्ही दोघांचे तिघे झालो. माझ्या लहान परीचं या जगात स्वागत आहे’. त्याच्या या पोस्टवर मित्र, परिवार आणि चाहते नवजात बाळाचे जगात स्वागत करत आहेत. सोबतच मोहित आणि अदितीला शुभेच्छा देत बाळाला आशीर्वाद देत आहेत. मोहित आणि आदिती त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून भेटले आणि प्रेमात पडले. पण त्यांनी आपले रिलेशनशिप सगळ्यांपासून लपवून ठेवले. थेट लग्नाची बातमी देत मोहितने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर मोहितने आता पत्नीच्या प्रेग्नेंसीची बातमीदेखील अशीच गुपित ठेवली आणि थेट बाबा झाल्यानंतर हा आनंद शेअर केला आहे.

Tags: Blessed With Baby GirlInstagram PostMohit RainaTV Actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group