Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ब्रह्मास्त्र 2’ चित्रपटात कोण साकारणार देव..?; दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Brahmastra 2 - God
0
SHARES
9.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू केली आहे. बॉयकॉट बॉलिवूड असा डेंजर ट्रेंड सुरु असतानाही या चित्रपटाने तब्बल २२५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आशा आहे की, हा चित्रपट आणखी मोठी मजल मारेल. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन यांच्या मुख्य भूमिका असून हा शस्त्रांवर रचलेला एक चित्रपट आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

सध्या प्रेक्षक या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा यश दर्शवित आहे. यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी उत्सुकता वाढली आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा दुसरा भाग हा देवांवर आधारित असून याबाबत एक मोठी अपडेट चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

‘ब्रह्मास्त्र- शिवा’ बनवण्यासाठी ८ वर्ष लागली पण ‘ब्रह्मास्त्र- देव पार्ट २’ लवकर येणार अशी माहिती दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली आहे. अयानने अलीकडेच एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने ‘ब्रह्मास्त्र २’विषयी काही माहिती दिली आहे. या मुलाखतीत त्याने खुलासा करताना म्हटलं आहे की, ‘सध्या मी ‘ब्रह्मास्त्र पार्ट २ देव’ विषयी खूप जास्त काही सांगू शकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

पण देवमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही दाखवले जाणार आहेत. तसेच कलाकारांविषयी बोलायचं तर, सिनेमाचा पहिला भाग फक्त फाऊंडेशन होता.. स्टोरी सेटअपसाठी. पण असं असलं तरी या नवीन भागात देव कोण साकारणार हे मी आताच तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा याची अधिकृत घोषणा केली जाईल.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

पुढे म्हणाला कि, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पार्ट २’चे कथानक तेव्हापासून तयार आहे जेव्हापासून पहिल्या भागाचं आम्ही काम सुरू केलं होतं. यावेळी सिनेमाच्या प्रॉडक्शनवर काम करण्याची प्रोसेस मात्र कदाचित लांबू शकते. कारण ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या भागावर तेव्हाच काम सुरू होईल जेव्हा पहिल्या भागावरचं सगळं काम संपेल आणि आमची टीम म्हणेल की, चला आता सुरु करुया नवीन भागावर काम.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

शक्यतो आमचा प्रयत्न असेल की ‘ब्रह्मास्त्र पार्ट २’ डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज करता येईल. एव्हढं सांगताना अयानने आगामी भागात देव आणि अमृत ही दोन मुख्य पात्र कोण साकारणार आहे यावरील पडदा काही उघडला नाही.. ? त्यामुळे तूर्तास जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत उत्सुकता अशीच ताणलेली राहील.

Tags: ayan mukherjeeBrahmastra Part One ShivaInstagram Postupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group