Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा..’; केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kedar Shinde
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्यात २८ तारखेला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्मिती त्यांची पत्नी बेला शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे. काल ९ मे रोजी केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवसानिमित्त केदार शिंदेंचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि सिनेविश्वातील निकटवर्तीय या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. दरम्यान केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

केदार शिंदेंनी हि खास पोस्ट पत्नी बेला शिंदे यांच्यासाठी शेअर केली आहे. दोघांचा एक गोड फोटो शेअर करत केदार यांनी लिहिले आहे कि, ‘प्रिय बेला, गेली २७ वर्षे, माझ्या प्रत्येक वेडेपणात माझ्या पाठीशी उभी आहेस. हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये गुंतलो, पण माझ्या कामात ढवळाढवळ न करता, तू मात्र प्रत्येक आव्हानांना तोंड दिलंस. आत्ता सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही शांत संयमी राहण्याचा नेहमीप्रमाणे सल्ला दिलास. अजून खुप काही करायचं आहे. तुला सुखात ठेवायचं आहे. त्यामुळे आणखीन वेडेपणासाठी तयार राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

केदार शिंदेंची हि पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमधून एक गोष्ट समजते कि, केवळ केदार शिंदेच नव्हे तर त्यांची पत्नी बेला शिंदे यांनीदेखील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची कन्या सना अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पत्नी भानुमती साबळे अर्थात सनाने पणजीची भूमिका साकारली आहे आणि यासाठी तिचे कौतुकही झाले.

Tags: Anniversary PostBela ShindeInstagram PostKedar shindeMaharashtra Shahir
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group