हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या बिग बॉस मराठी सीजन ४ चे होस्टिंग करत आहेत. त्याची चावडी बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक आतुर असतात. याशिवाय ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा त्यांचा आगामी चित्रपट बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. यातच आता आणखी एका संकटाला मांजरेकरांना तोंड द्यावे लागणार आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कोर्टाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याचे समजत आहे.
एका अपघातात एका आश्रम शाळेच्या संस्था चालकाविरोधात महेश मांजरेकर यांनी अर्वाच्च वक्तव्य केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर मांजरेकरांच्या गाडीचा अपघात झाला होता. ज्या गाडीसोबत हा अपघात झाला ती गाडी एका आश्रम शाळेच्या संस्था चालकाची होती. दरम्यान मांजरेकरांनी संबंधित संस्था चालकाविरोधात बदनामीपूर्वक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत टेभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यांनतर पंढरपूरच्या माढा न्यायालयाने पोलिसांना मांजरेकरांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रम शाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वाहनांमध्ये पुणे- सोलापूर महामार्गावर यवत गावाजवळ गतवर्षी २०२१ साली हा अपघात झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी आपल्याविषयी बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप कैलास सातपुते यांनी केला होता. आपल्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून आपली प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद सातपुते यांनी माढा कोर्टात दिली होती. या फिर्यादीची दखल घेत आता न्यायाधीश गांधी यांनी पोलिसांना मांजरेकरांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post