Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले.. संवाद..’; ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाची स्पष्ट प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 26, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Raavrambha
0
SHARES
81
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाज्वल्य आहे आणि त्यामुळे त्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवणे कुणाचेही काम नाही. यासाठी पूर्ण अभ्यासानिशी सर्व बारकावे तपासून इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवावा लागतो आणि यात आपण कमी नाही हे वारंवार मराठी दिग्दर्शक तसेच निर्मात्यांनी दाखवून दिले आहे. नुकताच ‘रावरंभा’ हा सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी सांगणारा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी चित्रपट पाहिल्यानंतर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Raavrambha – रावरंभा (@raavrambhafilm)

यामध्ये महेश टिळेकर यांनी लिहिले आहे कि, ‘डोळ्यात आणि ह्रुदयात साठवावा ‘राव रंभा’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले.पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच ‘राव रंभा’ सिनेमा आहे. हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले, फिल्मी वाटावे असे संवाद ह्या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो. प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला ” कधी संपतोय सिनेमा?” हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Shirish Parab (@shirish.parab.58)

सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेबिंच्या देठा पासून दात ओठ खात राक्षसा सारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो. सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणनारा की जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही. सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल ह्या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब. युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणनारा.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Tilekar (@maheshtilekar)

शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो. नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते. चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत. निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे… मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास ‘राव रंभा ‘ अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील, असे महेश टिळेकर यांनी म्हटले आहे.

Tags: Instagram Postmahesh tilekarMarathi MovieMovie ReviewRavrambha
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group