Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जिस में है दम.. तो फक्त ‘बाजीराव सिंघम’; रोहित शेट्टीने केली सिक्वेलची घोषणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 3, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Singham Again
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या नव्या वर्षात अनेक नव्या घोषणा होताना दिसत आहेत. कारण वर्ष बदललं आहे पण मनोरंजनाची वारी थांबून कशी चालेल.? म्हणूनच प्रत्येक सिनेसृष्टीतील मनोरंजनाचा प्रवाह सुरूच आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये बॉलिवूड चित्रपटांना म्हणावं तसं यश मिळालं नसेल. पण हे नवं वर्ष आहे.. काय माहित या वर्षात बॉलिवूडचं नशीब पुन्हा पालटलं तर.. त्यामुळे काहीही झालं तरी मनोरंजन थांबून चालणार नाही. म्हणूनच बॉलिवूडचा लोकरीप्रिय ऍक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीने प्रेक्षकांना हवीहवीशी असणारी घोषणा केली आहे. या नव्या वर्षात आपण सिंघम ३ घेऊन येत आहोत अशी घोषणा त्याने केली आहे आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा ‘सर्कस’ हा चित्रपट अलीकडेच येऊन गेला. या चित्रपटाची स्टार कास्ट तगडी होती पण बॉक्स ऑफिसवर मात्र तो काही जादू दाखवू शकला नाही. असे असले तरीही थांबेल तो रोहित शेट्टी थोडीच. म्हणूनच आता रोहित शेट्टी सर्कस’च्या अपयशानंतर ‘सिंघम ३’च्या तयारीला लागला आहे. याबाबत सिंघम फेम बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा २०२२ मधील जॅकपॉट चित्रपट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता नव्या वर्षात अजय देवगणच्या ‘सिंघम’ची घोषणा केल्यामुळे त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करत त्यामध्ये रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे कि, ‘रोहित शेट्टी बरोबर ‘सिंघम अगेन’च्या कथनाने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली. मी कथा ऐकली कथा फायर आहे. देवाच्या इच्छेनुसार हा आमचा ११ वा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल’. एकंदरच या पोस्टवरून समजत आहे कि, ‘सिंघम’च्या पुढील भागाचं नाव ‘सिंघम अगेन’ असं असणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग अर्थात ‘सिंघम’ हा २०११ साली प्रदर्शित झाला होता. नंतर २०१४ साली ‘सिंघम रिटर्न्स’ आणि आता लवकरच ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Ajay DevgnDeepika PadukoneInstagram Postrohit shettySingham AgainUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group