हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. यामुळे अनेकदा ती स्वतःचे स्टनिंग लूक सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. कधी फोटो तर कधी व्हिडिओच्या माध्यमातून दिशा आपल्या चाहत्यांचे तसेच नेटकऱ्यांचे लक्ष ओढून घेताना दिसते. याहीवेळी तिने असंच एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे आणि यामध्ये ती कहर दिसते आहे. तिची स्टाईल आणि तिचा कॉन्फिडन्स तिच्या सौंदर्याला आणखीच चार चाँद लावत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने अगदी किलर पोज दिल्या आहेत. सिझलिंग लूक, स्टनिंग आऊटफिट आणि ब्युटीफुल दिशा असं परफेक्ट समीकरण या फोटोंमध्ये जुळून आलं आहे. तसं पाहिलंत तर दिशांच्या स्टाईल आणि स्माईलवर नेहमीच नेटकरी फिदा असतात. पण यावेळी नेटकऱ्यांना दिशा काहीशी उदास वाटते आहे. यामुळे काहींनी कमेंटमध्ये तिची विचारपूस देखील केली आहे. दिशाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘पॅशन तुम्हाला वेड लावू शकते’. यानंतर तिने कॅप्शन काढून टाकले आहे. यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘ती नेहमीप्रमाणेच निरागस दिसत आहे, पण फोटोमध्ये इतकी गंभीर का आहे..?’
दिशांच्या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारी निराशा तिच्या आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपमुळे आहे असेही काहींनी म्हटले आहे. त्याच काय आहे.. अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते अशी चर्चा होती. यानंतर अलीकडेच काही काळापूर्वी त्यांनी एकमेकांसोबतचं हे नातं संपवून ब्रेकअप केल्याचे समोर आले होते. काही कारणास्तव त्यांच्यात सतत वाद होत होते आणि या वादामुळेच त्यांनी वेगळं होण्याचं ठरवलं. टायगरच्या मित्राने या वृत्ताला दुजोरा देत सांगितले होते कि, टायगर- दिशा लिव्ह-इनमध्ये होते. यात दिशाला लग्न करायचं होत पण टायगर लग्नासाठी तयार नव्हता आणि म्हणून त्यांचं ब्रेकअप झालं.
Discussion about this post