Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डेट नाईट.. बनारसी पटोला.. रिक्षावाला..’; Mr. आणि Mrs. जोनासचं मुंबईच्या रस्त्यावर हटके फोटोशूट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Priyanka Chopra_Nick Jonas
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडसोबत हॉलिवूड सिनेविश्वालाही भुरळ घालणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे त्यांची मुलगी मालतीसह भारतात आले आहेत. प्रियांकाची बहीण परिणीती चोप्राचं लग्न हे त्यांच्या भारत दौऱ्याचं मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. तर सूत्रानुसार, नीता अंबानी यांच्या कल्चरल प्रोग्रामसाठी ते मुंबईत दाखल झाल्याचे बोलले गेले. अशातच आता प्रियंका आणि निक यांनी मुंबईत भटकंतीचा आनंद घेत एक भन्नाट फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

हे फोटोशूट नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या नाईटदरम्यान केले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने लिहिले आहे कि, ‘माझ्या हक्काच्या माणसासोबत निकसोबत डेट नाईट..’ इतकेच नव्हे तर या फोटोमध्ये प्रियंकाने परिधान केलेल्या ड्रेसबाबत एक खास गोष्ट तिने सांगितली आहे. तिने म्हटलंय कि, ‘हा सुंदर पोशाख ६५ वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीचा वापर करून बनवला गेला आहे. यात चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रो प्लेटिंग वापरले आहे’.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

इतकेच नव्हे तर, प्रियंका आणि निकने मुंबईच्या रिक्षासोबत खास फोटो क्लिक केले आहेत. प्रियांका- निक या फोटोसाठी पोज देत असताना रिक्षावालासुद्धा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहताना दिसतो आहे. प्रियांका- निक यांचं हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे रिक्षा, रिक्षावाला आणि प्रियांकाचा ६५ वर्षांपूर्वीची साडी रिसायकल करून तयार करण्यात आलेला हा ड्रेस चर्चेचा विषय ठरतो आहे.

Tags: Instagram PostNick JonasPriyanka ChopraTrending CoupleViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group