Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ कारणामुळे BIGG BOSS करणार विकासची हकालपट्टी; स्पर्धकांच्या वादाचा मेकर्सलाही दणका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 30, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
12.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये रोज काही ना काही ड्रामा होतंच असतो. कधी बाचाबाची तर कधी हाणामारी पर्यंत हे सदस्य जाताना दिसतात. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेला विकास आणि सीजन १६ ची कहर स्पर्धक अर्चना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राडे आपण पाहिलेच. पण हे वाद त्यांच्यापुरता मर्यादित न राहिल्यामुळे याचा फटका बिग बॉसच्या शो मेकर्सला बसणार आहे. कारण हे प्रकरण अशा थराला पोहोचलं आहे कि, बिग बॉसला नव्हे तर थेट घटनात्मक संस्थेला हस्तक्षेप करावा लागलाय. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) बिग बॉसच्या निर्मात्यांना शोमध्ये या शोमध्ये स्पर्धकांनी केलेल्या जातीबाबत वादग्रस्त वक्तव्यावर उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं की, अर्चना गौतम आणि वाईल्ड कार्ड स्पर्धक विकास मानकताला यांच्यात वाद झाला असताना दोघांनीही सर्व सीमा पार केल्या. अर्चना विकासाच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करू लागली तर विकासने आपली पातळी सोडून अर्चनाला खालच्या जातीचे लोक म्हणून संबोधले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे एससी/एसटी कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे, असं आयोगाने म्हटलं आहे.

EXCLUSIVE AND CONFIRMED#VikkasManaktala has been eliminated from the house

— The Khabri (@TheKhabriTweets) December 29, 2022

याच्या परिणाम स्वरूपी मेकर्स विकास मानकताला याला शोमधून बाहेर काढणार आहात. बिग बॉस शो संबंधित बिग बॉस खबरी नामक एका ट्विटर हँडलवर ‘या प्रकरणामूळे विकास मानकताला याला शोबाहेर काढून टाकल्याचे बोलले जात आहे.’

National Commission for Scheduled Castes issued notice to Mumbai CP, Viacom 18 Media Pvt Ltd, Endemol India Pvt Ltd &others after a Bigg Boss contestant Vikas Manaktala called another contestant Archana Gautam "Neech jati ke log" which is offence punishable under SC/ ST act: NCSC pic.twitter.com/D0U2u0xeQD

— ANI (@ANI) December 29, 2022

घरातील वादामध्ये जातीचे नाव जाणीवपूर्वक घेतल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना तसंच कलर्स टीव्ही, एंडेमोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, वायकॉम18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनादेखील ही नोटीस जारी केली आहे. आयोगाने शोच्या निर्मात्यांना तसेच कलर्स टीव्ही वाहिनीला या प्रकरणी पुढील ७ दिवसांत या घटनेची तारीख, तपशील आणि इतर माहिती देऊन उत्तर देण्यास सांगितले आहे. हा अहवाल वेळेवर दिला नाही तर पुढील कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVPromo VideoVikas Manaktala
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group