Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ड्रग्ज तस्करी प्रकरणी रकुल प्रीत, राणा दग्गुबाती आणि रवी तेजासह 12 जणांना EDचे समन्स जारी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन क्षेत्रात मनोरंजनाव्यतिरिक्त सगळं काही घडताना दिसत आहे. कुठे पॉर्नोग्राफी चित्रीकरणाची केस चर्चेत आहे तर कुठे सेक्स रॅकेट.. यानंतर आता ड्रग्स तस्करी प्रकरणाचा नवा सुगावा लागला आहे. याआधी सुशांत सिंग आत्महत्येनंतर ड्रग्जचे प्रकरण मोठे गाजले होते. यानंतर आता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमधून मोठी बातमी समोर येत आहे. साउथचे लोकप्रिय चेहरे असणारे रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रवी तेजा आणि पुरी जगन्नाथसह अन्य बऱ्याच दिग्दर्शकांचा ड्रग्ज तस्करी आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा हात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत एकूण १२ लोक EDच्या रडारवर असून त्यांना समन्स जरी करण्यात आला आहे.

The #EnforcementDirectorate (ED) has summoned 12 Tollywood actors and directors, including #RakulPreetSingh (@Rakulpreet), #RanaDaggubati (@RanaDaggubati) and #RaviTeja (@RaviTeja_offl), in connection with a four-year-old drugs case. pic.twitter.com/u6yeMXh7NF

— IANS (@ians_india) August 25, 2021

 

सक्तवसूली संचलनालय म्हणजेच EDने (Enforcement Directorate) ४ वर्ष जुन्या असलेल्या एका ड्रग्ज प्रकरणामध्ये टॉलीवूडचे टॉप एक्टर आणि डायरेक्टर यांना समन्स जारी केला आहे. यात रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रवि तेजा आणि पुरी जगन्नाथ यांचादेखील समावेश आहे. मुख्य म्हणजे यात सगळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीशी संबंधित लोक आहेत आणि हे सगळे लोकप्रिय चेहरे आहेत. या सगळ्यांना एकावेळीच समन्स पाठवण्यात आले आहेत. रकुल प्रीत सिंहला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर तर रवि तेजाला ९ सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथला ३१ सप्टेंबरला EDने बोलावले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तेलंगाणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. या विभागाद्वारे २०१७ साली जुलै महिन्यात एका फेमस बारमध्ये केलेल्या तपासानंतर दाखल करण्यात आलेल्या १२ खटल्यांवर 30 लाख रूपये किंमतीचा एलएसडी आणि कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी एकूण ११ चार्जशीट दाखल केल्या गेल्या होत्या. सदरचा ड्रग्ज साठा विद्यार्थी आणि कलाकारांना पुरवला जात असल्याचे ठपका ठेवला होता.  सांगायची बाब अशी कि, रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा आणि पुरी जगन्नाथ यांची नावे आरोपी म्हणून घेतलेली नाहीत. परंतु सध्या तरी ते मनी लॉन्डरिंग प्रकरणामध्ये सामील नाहीत असे काही सांगता येणार नाही, असे एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानि म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CNubU9jDXo2/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान २०१७ सालामध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने ३० लाख किमतीचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी एकाचवेळी १२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच यातील ११ प्रकरणांमध्ये आरोपपत्रसुद्धा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ३० जणांना अटक करण्यात आली असून ६२ जणांची तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने ड्रग्जप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. यातील ज्यांची चौकशी करण्यात आली त्यातील साधारण ११ लोक हे थेर चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत.

Tags: Drug Trafficking CaseED SummonsJagannath Purirakul preet singhrana dagubbatiRavi TejaSouth Industry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group