हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि मोठे नाव असणारी एकता कपूर तिच्या विविध मालिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या सुपरहिट मालिकांची कर्तीधर्ती म्हणून एकता ओळखली जाते. त्यामुळे एकता कपूरचा स्वतःचा मोठा असा चाहता वर्ग आहे. अशातच रक्ताने तिच्या चाहत्यांना एक मोठा धक्का देणारी बातमी दिली आहे. माहितीनुसार प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने वर्षभरापूर्वीच सुरु केलेल्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकारांवर पाणी सोडले आहे.
निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी २०१७ साली लाँच केलेल्या त्यांच्या OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji याचे प्रमुखपद त्यांनी सोडले असून आता या प्लॅटफॉर्मची जबाबदारी नव्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. एकता कपूरने याबाबत स्वत: पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. एकता कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये तिने लिहिले आहे की, ‘आज अधिकृतपणे एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी Alt Balaji कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची राजीनामा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू झाली होती. ALTBalaji कडे आता नवीन टीम आहे’.
एकता कपूरने तिच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करता यावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. या एकताने दिलेल्या माहितीनुसार, आता विवेक कोका हे Alt Balaji OTT प्लॅटफॉर्मचे नवे चीफ बिजनेस ऑफिसर असणार आहेत. याचा उल्लेख तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘विवेक कोका हे Alt Balaji चे नवीन चीफ बिजनेस ऑफिसर असल्याची घोषणा करताना कंपनीला आनंद होत आहे’. Alt Balaji हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून विविध कटेंटसाठी ओळखला जातो. Alt Balaji’ ने गेल्या दोन ते तीन वर्षांत बरेच चढ उतार पाहिल्यानंतर आता एकताने हज निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
Discussion about this post