हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ सध्या कमालीचा चर्चेत असलेला शो आहे. मुळातच बिग बॉस या शोची ख्याती प्रचंड असल्यामुळे याचे प्रत्येक सीजन हिट होताना दिसतात. शिवाय या घरात अनेक नाती तयार होताना दिसतात. ज्यावर घरातील सदस्य आणि घराबाहेरील प्रेक्षक अनेकदा प्रश्नचिन्ह लावतात. अशीच काही नाती याहीवेळी घरात तयार झाली आहेत. म्हणूनच आज बिग बॉसच्या घरात कोर्ट उभारलं गेलं आहे. या कोर्टात अशा प्रत्येक नात्याचा पर्दाफाश होणार आहे जे नातं सगळ्यांच्या नजरेत खोट आहे. यासाठी गौतम आणि सौंदर्यावर घरातील सदस्यांची एका वर एक आरोप लावले आहेत.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमो व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरात कोर्टरूम तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर आरोपीच्या पिंजऱ्यात गौतम आणि सौंदर्या यांना उभे करण्यात आले आहे. यावेळी घरातील एकूण एक सदस्य त्यांच्या नात्यावर एक एक शब्दाने वार करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर गौतमची सगळ्यात चांगली मैत्रीण निम्रीत अहलुवालिया, शालीन भनोत आणि टीना दत्ता देखील त्याच्या सौंदर्यासोबत असलेल्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभे करताना दिसत आहे.
मैत्रीची हि बदलेली समीकरणं आणि खऱ्या खोट्याच्या वादात अडकलेलं गौतम- सौंदर्याचं नातं या कोर्टात बेनकाब होणार आहे. यावेळी घरातील वातावरण पुन्हा एकदा पेटल्याचे दिसून येत आहे. सौंदर्यावर आरोप लागताना तिने शालीन आणि टिनाच्या नात्यावरदेखील बोटं उचललं आहे. ‘जर आम्ही नाटक करतोय असं ह्यांचं म्हणणं आहे तर मग हे दोघे काय करत आहेत..?’ असा सवाल सौंदर्याने उपस्थित केला आहे. शिवाय ‘माझ्या तोंडात कोणतेही शब्द टाकू नकोस’ असे गौतम निम्रीतला बोलताना दिसणार आहे. या कोर्टरूममधून बाहेर आल्यानंतर सदस्यांमध्ये खऱ्या आणि खोट्या नात्यांना ओळखण्याची क्षमता तयार होईल का..? असा एक सवाल इथे उपस्थित होत आहे.
Discussion about this post