हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि साजिद खान यांच्यामधील वाद आता हळू हळू वाढताना दिसतोय. अगोदरच्या साजिद खानविरोधात नेटकऱ्यांनी संतापाचा सूर ओढला आहे. मी टू प्रकरणामुळे सोशल मीडियावर साजिद खानवर नेटकरी आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान या सगळ्यात आता भर म्हणून शर्लिन चोप्राने उडी घेतली आहे. तिने पोलीस ठाण्यात जाऊन साजिदला बिग बॉस शोमधून बाहेर काढा अशी मागणी केली आहे. शिवाय ती लवकरच लेखी निवेदन देणार असल्याचेही तिने सांगितले आहे.
माननीय केंद्रीय मंत्री, श्री @ianuragthakur जी से हम सभी पीड़ित महिलाएँ और वो लोग जो यौन शोषण का विरोध करते हैं, हमारी गुज़ारिश है कि #BigBoss शो के ब्रॉडकास्ट को तत्काल रद्द कर दिया जाए।
किसी भी महिला की गरिमा और सुरक्षा से बढ़कर कोई TRP रेटिंग नहीं हो सकती है! #EvictSajidKhan pic.twitter.com/Mt2zjMKHJM— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 19, 2022
शर्लिनने साजिदला बिग बॉसमधून बाहेर काढा म्हणत पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तिने एक पोस्ट इंस्टावर शेअर केली आहे. तिने पोलिसांसमोर बिग बॉसच्या १६ व्या सिजनवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. साजिदच्या विरोधात आपण आक्रमक पाऊले घेऊन त्याला त्या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवा असेही तिने म्हटले आहे. यावेळी शर्लिनने काही माध्यमांशी बातचीत केली. या व्हायरल झालेल्या मुलाखतीत शर्लिन म्हणाली कि, ‘महिलांना त्रास देण्यासाठी साजिद ओळखला जातो. त्यानं अनेकांना खूप त्रास दिला आहे. त्याला बिग बॉसमध्ये राहण्याचा काही हक्क नाही. त्याच्यावर अनेकांनी वेगवेगळे आरोपही केले आहेत. मी पोलिसांकडे यासाठी आले होते की, त्याला त्या शोमधून निर्मात्यांनी बाहेर काढावे.’
हम सभी पीड़ित महिलाएँ और वो तमाम लोग जो यौन शोषण का विरोध करते हैं, हमारी गुज़ारिश है श्री @ianuragthakur जी से कि #BigBoss शो के ब्रॉडकास्ट को तत्काल रद्द कर दिया जाए।
बिग बॉस में #MeToo आरोपी साजिद ख़ान की मौजूदगी हम पीड़ित महिलाओं के मुँह पर एक करारा तमाचा है! @AmitShah जी 🙏🏻 pic.twitter.com/j8grvTq7nu— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 17, 2022
पुढे म्हणाली कि, ‘साजिदवर मी टू चे आरोप आहेत. अशावेळी त्याला बिग बॉसच्या शोमध्ये का स्थान देण्यात आले असा प्रश्न शर्लिननं याप्रसंगी उपस्थित केला आहे. निर्माते काही ऐकायला तयार नाही. ते साजिदला काढण्यास नकार देत आहे. त्यांना आमची काळजी नाही. त्यामुळे मी आता केंद्रीय सुचना आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील पत्र लिहून साजिदविषयी तक्रार करणार आहे. अशा शोवर बंदी आणावी असे त्यांना सांगणार आहे. ज्या कार्यक्रमामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार करणारा साजिद आहे त्याला त्या शोमध्ये स्थान दिले जाते. तेव्हा तो शो च बंद करावा असे त्यांना लेखी निवेदन देणार असल्याचे सांगणार असल्याचे शर्लिननं म्हटले आहे.’
Discussion about this post