हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील नामांकित निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. हि बातमी अशी आहे कि, कारण जोहर यांनी सोशल मीडियावरुन एक्झिट घेत अधिकृत ट्विटर हॅण्डल डिलीट केले आहे. म्हणजेच आता यापुढे करण जोहर ट्विटरवर ऑनलाईन दिसणार नाहीत. त्यांनी ट्विटरला टाटा बायबाय केले आहे. पण हा निर्णय त्यांनी का घेतला असेल..? अनेक चाहत्यांना आणि युजर्सला देखील हाच प्रश्न पडला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी सेलिब्रिटी प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. पण जेव्हा एखादा सेलिब्रिटी स्वतःहून ट्विटरला राम राम ठोकतो तेव्हा मात्र ‘कुछ तो गडबड है दया’ अशी फिलिंग येते. करणचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इतकेच काय तर कित्येक ट्रोलर्सचा करण लाडका विषय आहे. पण आता त्याने ट्विटर बंद केल्यामुळे त्याला ट्रोल करणं ट्रोलर्ससुद्धा मिस करणार आहेत. यातही अनेक ट्रोलर्सने चांगलं केलंस, गुड डिसिजन म्हणत आता तुझा शो पण बंद करून टाक असे म्हटले आहे.
So Finally #KaranJohar left The Twitter …. What A Coward pic.twitter.com/kg5ZjirHln
— Indic Spectrum (@IndicSpectrum) October 10, 2022
करण जोहरने अधिकृत ट्विटर हॅण्डल डिलीट केले असून आता ट्विटरवर करण परतणार का नाही..? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान ट्विटर सोडण्याची घोषणा केल्यानंतर करण एकदम लाईमलाईटमध्ये आला आहे. पण त्याने हा निर्णय इतका झटपट आणि घाईत का घेतला असेल..? याचे उत्तर काही कुणाला सापडलेले नाही.
🚨 #KaranJohar quits Twitter
Wonder why? pic.twitter.com/59Yr71vJwn
— Kreately.in (@KreatelyMedia) October 10, 2022
त्याने शेवटचे ट्विट करताना लिहिले आहे कि, ‘मला आणखी पॉझिटिव्ह एनर्जी हवी आहे. त्यामुळे मी एक नवे पाऊल टाकत आहे. त्यासाठी मी ट्विटरला गुडबाय करतो आहे.’ यानंतर त्यानं त्याचं ट्विटर अकाउंट बंद केले. (अकाऊंट डिलीट केल्यामुळे लिंक देता आलेली नाही याची नोंद घ्यावी.)
Discussion about this post