हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात चंद्राच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर रमजान ईद साजरी केली जाते आणि आज जगभरात ‘ईद-उल-फितर’ अर्थात ‘रमजान ईद’ साजरी केली जात आहे. २०२३ सालची ईद-उल-फितर जगभरातील मुस्लिम बांधव मोठ्या दिमाखत साजरी करत आहेत. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे. जे ईद साजरी करत आहेत आणि त्यांनी आपल्या चाहत्यांना या अत्यंत खास दिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
१) सलमान खान : सलमानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ईदचा भव्य उत्सव आयोजित केला आहे. इथे शाही मेजवानी आणि दिग्गज सेलिब्रिटींचे आगमन होईल. सोबतच सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
२) शाहरुख खान : शाहरुख खानने त्याच्या मन्नतच्या बाल्कनीतून धाकटा लेक अबरामसोबत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहरुखचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे.
३) सैफ अली खान- करीना कपूर खान पतौडी : सैफ अली खान पतौडीचे संपूर्ण कुटुंब दरवर्षी एकत्र येऊन ईद अतिशय उत्साहात साजरी करताना दिसते. सैफ, करीना त्यांची मुलं, शिवाय सोहा अली खान तिचा पती कुणाल खेमू, सबा आणि आई शर्मिला टागोर असे सगळे मिळून हा सण साजरा करतात.
४) आमिर खान : आमिर खानदेखील त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत ईद साजरी करतो. किरण राव, फातिमा सना शेख, त्यांची मुले जुनैद खान, आझाद राव खान, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यासोबतचे यंदा तो ईद साजरी करत आहे.
५) देवोलिना भट्टाचार्जी : टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लग्नानंतरची पहिली ईद साजरी करत आहे. तिने एक सुंदर लेहंगा परिधान केलेला फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
६) हिना खान : टीव्ही अभिनेत्री हिना खानने देखील आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना काही फोटो शेअर केले आहेत. हिनाने काश्मीरला तिच्या गावीच ईद साजरी केली आहे.
७) नकुल मेहता : ‘बडे अच्छे लगते हैं 2’ फेम नकुल मेहताने सुद्धा आपल्या चाहत्यांना ईदच्या निमित्ताने खास शुभेच्छा देत फॅमिली फोटो शेअर केला आहे.
८) सुंबुल तौकीर खान : बिग बॉस सीजन १६ फेम सुंबुल तौकीर खानने देखील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post