Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता वरुण धवनच्या वडिलांची तब्येत बिघडली; मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात करावी लागली हार्ट सर्जरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Varun David Dhawan_
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता वरुण धवनचे वडील आणि बॉलिवूड सिनेसृष्टीला एकापेक्षा एक जबरदस्त कलाकृती देणारे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याविषयी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत राहिले. दोन वर्षांपासून ते मधुमेहाने ग्रस्त असल्याचेही समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत फारशी ठीक नव्हती. यानंतर आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड धवन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे सांगितले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Naya Daur (@nayadaurpk)

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक डेविड धवन यांच्यावर मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे समोर आहे आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. परंतु डेव्हिड धवन यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य धवन कुटुंबाकडून आलेलं नाही. डेव्हिड धवन यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या बातमीची पुष्टी केलेली नाही. अगदी त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन यानेही माध्यमांशी बोलणे टाळले आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

असे असले तरीही, धवन कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने या बातमीची पुष्टी करत सांगितले आहे की, ‘डेव्हिडची पत्नी लाली धवन, वरुण आणि रोहित शस्त्रक्रियेदरम्यान खूप अस्वस्थ होते. पण आता सर्व काही ठीक आहे. सर्व कुटुंब मिळून डेव्हिड धवन यांची काळजी घेत आहे’. गतवर्षीदेखील डेव्हिड धवन यांची मधुमेहामुळे प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र त्यावेळी वरुण त्याच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या प्रमोशन व्यस्त होता. तरीही प्रमोशन सोडून वरुण वडिलांच्या काळजीपोटी हॉस्पिटलमध्ये आल्याचे दिसले होते.

Tags: bollywood actorbollywood directordavid dhawanvarun dhawanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group