हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिक्षण सोडून हाती तबला घेत ज्यांनी अक्ख्या महाराष्ट्राला वेड लावले त्या लोकसंगीतकार आनंद शिंदे यांचा आज २१ एप्रिल रोजी ५६ वा वाढदिवस आहे. लग्नाची वरात असो नाहीतर आंबेडकर जयंती आनंद शिंदेंचे एकही गाणे वाजणार नाही असे होऊच शकत नाही. वडिल प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीताचा आदर करायला भाग पाडले आहे. आज त्यांचा मुलगा आदर्श शिंदे देखील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे.
दमदार गायकी आणि ठसकेदार आवाज हीच आनंद शिंदे यांची खास ओळख आहे. ८०च्या दशकात धुमाकूळ घालणारे गाणे ‘जवा नवीन पोपट हा’ ऐकले की सर्वप्रथम डोळ्यापुढे चेहरा येतो आनंद शिंदे यांचा. आनंद मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. पण त्यांचे लहानपण मुंबईत गेले. कव्वालीचे मुकाबले हे त्यांच्या खास आवडीचे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला आनंद नेहमीच जात होते. कोरसमध्ये गाणी गाणे त्यांना आवडत होत.
आजोबा उत्तम पेटीवादक आणि आजी सोनाबाई तबलावादक अशा संगीतप्रेमी घराण्यात आनंद यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कलेचा वारसा मिळाल्याने आनंद यांनी शाळेत असतानाच गाणे गायला सुरुवात केली. शाळेत अभ्यासापेक्षा जास्त एखाद्या शालेय कार्यक्रमात गाणे गायला कधी मिळणार याकडे त्यांचे नेहमीच लक्ष असे. आनंद यांनी नववीत नापास झाल्यानंतर हाती तबला घेतला. मार खात खात ते तबलावादन शिकले. जेव्हा कव्वालीचा मुकाबला असे तेव्हा आनंद आणि मिलिंद हे दोघे भाऊ ढोल वाजवायचे. वडिलांच्या गैरहजेरीत तेच कार्यक्रम करत असत.
आनंद शिंदेनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्शवगायन केले आहे. मुख्यत्वे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गायिलेल्या भीमगीतांसाठी अत्याधिक प्रसिद्ध आहेत. आनंद यांना दुनियादारी या मराठी चित्रपटातील देवा तुझ्या गाभाऱ्याला या गाण्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. तसेच मराठी रेडिओ मिर्ची कढून संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर स्टार प्रवाहतर्फे गायक ऑफ द इयर पुरस्कारानेदेखील सनमानीत करण्यात आले आहे. नुकतेच त्यांचे बंधू मिलिंद शिंदे यांच्या पत्नीचे निधन झाल्याकारणी संपूर्ण शिंदे कुटुंब दुखत आहेत. त्यामुळे यंदा त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार नाही.
Discussion about this post