हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय संगीत विश्वाला अत्यंत मोठा धक्का लागला आहे. आपल्या मधुर सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. बऱ्याच काळापासून त्या श्वसन विकाराने त्रस्त होत्या. दिवंगत गायिका सुमित्रा सेन या रवींद्र गायनासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाने संगीत कलाविश्वाची मोठी हानी झाल्याचे अनेक दिग्गजांनी म्हटले आहे.
#sumitrasen#RIPSumitraSen pic.twitter.com/6d7FcQiGfb
— The Bengal Org (@thebengalorg) January 3, 2023
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायिका सुमित्रा सेन या गेल्या बऱ्याच दिवसांपासून ब्रोको निमोनिया या आजराने त्रस्त होत्या. त्यांना २१ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या आजराशी त्यांची लढत अयशस्वी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी कोलकातामधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. सुमित्रा यांच्या रवींद्र संगीत गायनाचे केवळ भारतात नव्हे तर जगभारत अनेक चाहते आहेत. यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. संगीत विश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
Saddened by the demise of legendary Rabindra Sangeet Singer Sumitra Sen. #SumitraSen
— Raghujyoti Kundu (@KunduRaghujyoti) January 3, 2023
सुमित्रा यांना दोन मुली असून त्यादेखील रवींद्र संगीतामध्ये लोकप्रिय गायिका म्हणून परिचित आहेत. त्यांची मुलगी श्रावणी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत आईच्या निधनाची माहिती दिली आहे. यात तिने लिहिले आहे कि, ‘आई आम्हाला आज सकाळी सोडून गेली. ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती’. गायिका सुमित्रा सेन यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, ‘त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच मला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांनी कित्येक दशकं आपल्या गायकीनं चाहत्यांना सुरानंद दिला. त्या नेहमीच त्यांच्या आवाजाच्या रुपानं आपल्यात राहतील. त्यांच्या कुटंबियांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते’.
Discussion about this post