हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फँड्री या मराठी चित्रपटातील शालू भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फोटोस आणि व्हिडीओज मधून प्रेक्षकांना मोहून टाकत असते. तिच्या अशाच एका फोटोवर चाहत्याने कमेंट करत तिला लग्नाची मागणी घातली आहे. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पाहिजेल, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. त्या कमेंटला राजेश्वरीनेही हटके अंदाजात उत्तर दिलंय.
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, यांची चित्रित केलेल्या फँड्री या चित्रपटातील साधी सुधी शालू आता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसते. तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे ती प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिची अनोखी अदा आणि नवा लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे कित्येक चाहते घायाळ झाले आहेत. इतकेच नव्हे तर एका नेटकऱ्याने कमेंट करीत तिच्यासाठी थेट लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले, ” आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पाहिजेल”. यावर राजेश्वरीनेही तिच्या अंदाजात रिप्लाय दिला आहे. तिने लिहिले, ” बरोबर आणि माझ्या आयुष्याचे काय”. तिची हि कमेंट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
राजेश्वरी सध्या इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया अकाउंटवर रोज नवनवीन व्हिडीओ शेअर करीत असते. तिची घायाळ करणारी अदा आणि हटके अंदाज प्रेक्षकांची नजर स्वतःकडे ओढण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे “शालूच्या पिरतीचा हा विंचू प्रेक्षकांना चावला आणि शालूला पावला” असे म्हणायला वावगे ठरणार नाही.
Discussion about this post