हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली हे आपण जाणतोच. यानंतर तिने आपल्या लेकीची एक झलक दाखवावी यासाठी न जाणे कितीवेळा चाहत्यांनी तिला गळ घातली. मालती मेरी चोप्रा जोनस असे प्रियांका निकच्या लेकीचे नाव आहे. मालती लहानपणीच फेम जमा करताना दिसते आहे. प्रियांका तिच्या लेकीसोबतचे कित्येक फोटो शेअर करते पण तिचा चेहरा दाखवत नाही यामुळे आधीच चाहते नाराज आहेत. त्यात आता प्रियांकाने मालतीच्या अर्ध्याच चेहऱ्याचा फोटो शेअर करून चाहत्यांना आणखीच नाराज केले आहे.
प्रियंकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये मालतीच्या अर्ध्या चेहऱ्याचा फोटो शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांची मॉर्निंग खरोकरच गुड करण्यासाठी तिने बुधवारी पहाटे मालतीचा झोपलेला असतानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये मालती बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झोपली आहे.
मालतीला पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी रंगाची टोपी घातली आहे. तर तिच्याभोवती शाल गुंडाळलेली दिसतेय. इतकं गोडं आणि निरागस पिल्लू किती शांत झोपलंय. याआधी प्रियंकाने मालतीचे फोटो शेअर करताना नेहमी हार्ट इमोजी चेहृयावर लावल्याचे दिसले. पण यावेळी मालतीचे डोळे टोपीने झाकलेले होते पण तिचे ओठ या फोटोत दिसत आहेत.
हा फोटो पाहून प्रियांकाच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण अनेकांनी प्रियांकाला ट्रोल केले आहे. बाळाचा चेहरा दाखवायचाच नाहीये तर कशाला फोटो पोस्ट करता असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकाला झापली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘लेक बापावर गेलीये.’ तर एकाने म्हटले आहे कि, ‘ किती गोड आहे हि.. किती शांत झोपली आहे.’ तर नाराज चाहत्यांनी म्हटले आहे कि, ‘चेहरा दाखवायचा नाही तर असे विचित्र इमोशन्ससह फोटो शेअरचं कशाला करता ?’ तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘चेहरा तर तुम्ही दाखवणार नाहीच आहात.. मग हि नाटक कशाला..?’
Discussion about this post