हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुःखद निधन झाले असून संपूर्ण मनोरंजन विश्व दुःखात आहे. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ न शकल्यामुळे विक्रम गोखले यांची प्राणज्योत आज मालवली. शुक्रवारी ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव काही वेळासाठी अंत्य दर्शनाकरिता बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या दर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra | Veteran Actor Vikram Gokhale passes away in Pune.
(File Pic) pic.twitter.com/bnLFbRyYnm
— ANI (@ANI) November 26, 2022
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात विक्रम गोखले यांच्यावर गेले अनेक दिवस उपचार सुरु होते. मात्र अनेक अवयव निकामी झाल्यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाहीत आणि आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामूळे चाहत्यांना मोठा धक्का लागला असून त्यांनी टाहो फोडला आहे. विक्रम गोखले यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून हलविण्यात आले असून अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ठेवले गेले आहे. नुकतेच त्यांचे पथिक बालगंधर्व रंग मंदिरात पोहोचले असून त्यांच्या दर्शनासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडे धाव घेतली होती. मात्र आता बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवले असता चाहत्यांची अलोट गर्दी या परिसरात दिसत आहे. विक्रम गोखले यांचे पार्थिव येथे अंत्य दर्शनासाठी फक्त काहीच वेळ ठेवले जाणार आहे. माहितीनुसार आजचं त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत. पुण्यातील वैंकुठ स्मशानभूमी याठिकाणी विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
Discussion about this post