हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीच्या बिग बॉसमधून प्रकाश झोतात आलेली शहनाझ गिल हि प्रेक्षकांची जान झाली आहे. शेहनाझचा चाहता वर्ग रोज दिवसागणिक वाढतच चालला आहे. यशाच्या एका वेगळ्याच शिखरावर शेहनाझ जाऊन पोहोचली आहे. अशातच सध्या तिचा सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडीओ अतिशय चर्चेत आला आहे. पंजाबची कॅटरिना अशी ओळख असलेली शहनाझ एअरपोर्टवर स्पॉट झाली आणि या दरम्यान तिच्या सोबत जे घडलं ते पाहून नेटकरी प्रचंड भडकले आहेत.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शहनाझ गिल दिसते आहे. यामध्ये शहनाज गिल एअरपोर्टमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अचानक एक चाहता तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी पुढे येतो आणि थेट तिच्या खांद्यावर हात ठेवू लागतो. मात्र, सावध शहनाज लगेच त्या व्यक्तीपासून दूर जाते आणि दुरूनच फोटोसाठी पोझ देते. या प्रसंगादरम्यान, शहनाझ येथून निघताना संबंधित व्यक्तीस बोलते कि, ‘तुझे क्या लगा तेरा दोस्त है.’ हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शहनाजच्या चाहत्यांनी त्या व्यक्तीवर प्रचंड संताप दर्शविला आहे. अनेकांनी या व्यक्तीसाठी अर्वाच्य शब्द प्रयोग करीत कमेंट केल्या आहेत. तर काही युजर्सने थेट त्याला मारण्याची धमकीसुद्धा दिला आहे. संतापलेल्या चाहत्यांपैकी काहींनी कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे कि, ‘कधीकधी फॅन्स मर्यादाच सोडतात’. तर आणखी एकाने लिहिले की, ‘सनापासून दूर राहा..’ याशिवाय आणखी एकाने तर, ‘तुझी हिंमतच कशी झाली..?’ असेही म्हटले आहे. याव्यतिरिक्त काहींनी शहनाझच्या सावधानगिरीने वागण्याची तारिफदेखील केली आहे.
Discussion about this post