हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०१६ साली झी मराठीवर प्रदर्शित झालेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली संजीव या अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात पदार्पण केले. मराठी मालिकांनंतर सायली कित्येक मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण करताना दिसली. सोशल मीडियावर सातत्याने ऍक्टिव्ह असणाऱ्या सायलीचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या नव्या लूकला भरभरून पसंती दिली आहे. कुणी लाईक करून तर कुणी कमेंट्स करीत तिच्या सौन्दर्याची प्रशंसा केली आहे.
सायली लवकरच झिम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा सायलीच्या नावाचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. सायलीने नेहमीच चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यावर भर दिला आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सायलीने प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या शैलींची भूमिका साकारली. झिम्मामध्येही ती एक वेगळ्या शैलीतील भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://www.instagram.com/p/Bq3oosOleeL/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या सायलीचे नव्या लूकमधील फोटो अतिशय चर्चेत आहेत. खरंतर या फोटोंमध्ये सायलीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सायलीचा हा लूक रसिकांनाही भुलविणारा आहे. ब्रायडल लेहेंग्यामुळे सायलीचे सौंदर्यं आणखीच खुलले आहे. सायलीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून चाहत्यांच्या नजरा फोटोंवरून हटूच शकणार नाही, असा तिचा आत्मविश्वासू अंदाज या फोटोत आपल्याला पाहायला मिळत आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post