हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोची होस्ट अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीने थेट परदेश गाठलं आहे आणि यामुळे काही दिवस ती हास्यजत्रेचे सूत्रसंचालन करताना दिसणार नाही अशी शक्यता आहे. ती परदेशी गेली असली.. व्यस्त असली तरीही तिने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडलेली नाही. तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि एक कमालीचं कॅप्शन शेअर केलं आहे. ते पाहून अनेकांनी अनेक तर्क लावण्याआधीच तिने स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. याला म्हणतात परफेक्ट कार्यक्रम.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतःचे गुलाबी साडीतील कमालीचे फोटो कातिल अंदाजासह शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने जे कॅप्शन लिहिले आहे ते मात्र भारीच चर्चेत आहे. कारण या कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय कि, ‘मैं जहाँ रहूँ.. मैं कहीं भी हूँ ….तेरी याद साथ है । (गैरसमज नसावा, प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय..). आता नुसतं सुरुवातीचं वाचलं तर कुणालाही असंच वाटेल कि प्राजु प्रेमात आहे. पण.. पण.. पण.. तसं काहीही नाहीये हे तिने स्वतःच सांगितलं आहे. त्यामुळे तर्क वितर्क लावण्याचा स्कोपच नाही.
अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यात काही तिचे सहकलाकार मित्र मंडळी आहेत, काही चाहते आहेत तर काही अन्य नेटकरी आहेत. यातील एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, किती क्युट आहेस तू. तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे कि, ‘लय भारी आहे तू खरंच’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने प्राजक्ताला प्रश्न विचारला आहे कि, ‘काय खाते ग तू प्राजक्ता एवढी गोड आहेस तर’.
इतकेच नव्हे तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘ कॅप्शन भारी टाकलाय आणि समजूत पण भारी काढलीये सगळ्यांची’. शिवाय प्राजक्ताने समीर चौघुले, नम्रता संभेराव, ओंकार भोजने आणि पृथ्वीक प्रताप या कलाकारांसोबत एक स्किट केले होते. ज्यामध्ये प्राजक्तासोबत फरसाण येतोच असं भारी मजेशीर कॉम्बिनेशन पहायला मिळालं. यावरून एका चाहत्याने कमेंट करीत म्हटलंय कि, ‘फरसाण खाल्ल्याने क्युट दिसतेस का..?’
Discussion about this post