हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका छोट्या स्वप्नातून मोठं काहीतरी करण्याची धडपड करणाऱ्या एका महिलेचा मोठा संघास घेऊन ‘हवाहवाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या मांडलेला विषय खरंच काळजाला भिडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची खास पसंती मिळते आहे. अत्यंत प्रेरणादायी अशी कथा या चित्रपटातून समाजासमोर मांडण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केलेल्या निमिषा सजयन या मल्याळम अभिनेत्रीच्या अभिनयाचेदेखील प्रेक्षकांनी बारभारून कौतुक केले आहे.
मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ या प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचे संपूर्ण लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे.
या चित्रपटाला अभिनेत्री निमिषा सजयनसह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन अशी तगडी स्टारकास्ट लाभली आहे. तर पंकज पडघन यांचे संगीत दिग्दर्शन आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उर्मिला धनगर यांचा सूरज आवाज लाभला आहे.
या चित्रपटात एक फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलेची कथा मांडण्यात आली आहे. अडचणीत खंबीरपणे पायावर उभं राहून आपल्या कुटुंबाला सावरणारी हि महिला कष्ट करते आणि संघर्षाला सामोरी जाते. या चित्रपटातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे. बऱ्याच काळानंतर एक प्रेरणादायी गोष्ट मराठी चित्रपटात मांडली आहे. हा चित्रपट पाहताना अनेकांचे डॊळे पाणावले. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो.
पण तो संघर्ष स्वाभिमान टिकवून लढणे महत्वाचा. यामुळे जेव्हा आपण हा चित्रपट प्रत्यक्षात चित्रपटगृहात जाऊन पहाल, त्यावेळी तुमच्याही डोळ्यात पाणी तरळलं नाही तर नवलंच! चित्रपटाबद्दल तिले कर व्यक्त होत म्हणाले कि, ‘हवाहवाई’ चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आनंददायी आणि भारावून टाकणारा आहे. एक अनोखी संघर्षकथा हवाहवाईतून मांडण्याचा, महिलांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. आता प्रेक्षकांकडूुन मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं वाटतं.
Discussion about this post