हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या सौंदर्यासह उत्तम नृत्य सादर करण्यासाठी अभिनेत्री मानसी नाईक फार लोकप्रिय आहे. त्यात मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर काही ना काही प्रतिक्रिया देत असतात. गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या आयुष्यात भावनांनी कल्लोळ घातला आहे. व्हायरल वृत्तानुसार, मानसी आणि तिचा पती प्रदीप एकमेकांपासून वेगळं होण्याचा विचार करत आहेत. हि बातमी ऐकताच अनेक नेटकऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या सोशल मीडियावर मानसी शेअर करत असलेल्या विविध पोस्टमधून वारंवार हाच संकेत मिळतोय कि ती लवकरच प्रदीपपासून वेगळं होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिने पतीसोबतचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेले नाहीत. इतकेच काय तर तिच्या प्रोफाईलवरून तिने प्रदीपसोबतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ काढून टाकले आहेत. शिवाय तिने गेल्या काही दिवसात शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती आपल्या आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्टीबद्दल व्यक्त होत आहे असेच वाटते.
जसे कि, ‘वाईट बातमी – काहीही कायम टिकत नाही. चांगली बातमी- काहीही कायम टिकत नाही.’ इथून त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची कुणकुण लागली होती. यानंतर अगदी काही तासांपूर्वी तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये तिने म्हटले आहे कि, ‘आजपासून भविष्याला सुरुवात होतेय’. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करीत तिची आणि प्रदीपची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘प्लिज प्रदीप आणि तू पुन्हा एकत्र या’.
तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘इतक्या थाटामाटात चार चौघात लग्न करून अस सहज गुपचुप का विलग व्हायचं..नवरा आणि बायको तर एक मन तर एक देह मग शांत रहायच, परखायच, नातच ते तुझ माझ तर व्हायचच.. ऑल द बेस्ट.. तुच्या चांगल्या आणि उत्तम आयुष्यासाठी.’ या कमेंट्स वाचून मानसी आणि प्रदीपचं वेगळं होणं चाहत्यांसाठी त्रासदायक बाब ठरत असल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post