Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शेतकऱ्याच्या लेकाचा वाढदिवस साजरा करायला शेतकरी नेते उपस्थित; फोटो झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Pravin Tarde
0
SHARES
175
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे मित्र मंडळी, चाहते आणि नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रवीण तरडे यांचं शेती प्रेम, परंपरा आणि संस्कृतीविषयी असलेला आदर याबाबत आपण सारेच ज्ञात आहोत. म्हणूनच शेती जपणाऱ्या या शेतकऱ्याच्या लेकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी त्यांच्या घरी केक घेऊन पोहोचले. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी तरडेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

शेतकऱ्यांचा आवाज अशी ख्याती असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे अनुत्तरित प्रश्न घेऊन शेट्टी हे कायमच सरकारला जाब विचारताना आणि धारेवर धरताना दिसततात. एवढेच काय तर ते सोशल मीडियावरही सक्रीय असल्यामुळे विविध प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. पण आज एका शेतकऱ्याच्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी खास पोस्ट शेअर करत तरडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रवीण तरडे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत या फोटोसोबत शुभेच्छापर कॅप्शन देऊन त्यांनी हि पोस्ट केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन, मोर्चे, पदयात्रा याकाळात गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत असणारे, चित्रपटातील यशस्वी नाव, शेतक-यांचा मुलगा व अभिनेता प्रविण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी साजरा केला.’ यावेळी प्रवीण तरडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राजू शेट्टी चक्क केक घेऊन तरडेंच्या घरी गेले होते. खरंतर राजू शेट्टी आणि प्रवीण तरडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, शिवाय दोघांचेही शेतीविषयी समान विचार आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. सध्या त्यांचा हा फोटो मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

Tags: Birthday Special PostFacebook Postpravin tardeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group