हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाय चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अलीकडे २४ जून २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांनी चित्रपटास उदंड असा प्रतिसाद दिला आहे. काळजाचा ठोका चुकवणारे कथानक असलेला ‘वाय’ हा चित्रपटपहिल्या लुकपासून चर्चेत होता. पुढे टिझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली होती. मुळात वाय चा अर्थ काय यातच प्रेक्षक जास्त उत्सुक होते. मात्र आता प्रदर्शनानंतर मिळालेल्या उत्तर प्रेक्षकांना भावले आहे आणि या चित्रपटाच्या कथानकाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षक आपला पाठिंबा तीव्रपणे दर्शविताना दिसल्या.
अभिनेत्री मुक्ता बर्वे या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत आनंदली आहे. तिने याबाबत बोलताना म्हटले कि, ‘समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला सर्हास घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो.
त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांनच्या मिळणाऱ्या प्रतिक्रया पाहून हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला असून चित्रपटाच्या विषयांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येत आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, असे मी समजते.’
‘वाय’ या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल एन प्रॉडक्शन्सची आहे. तर चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे आहे. शिवाय पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांचे आहे. कार्यकारी निर्माते म्हणून विराज विनय मुनोत यांनी काम पहिले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले हे कलाकार दिसत आहेत.
Discussion about this post