हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील सध्याची लोकप्रिय मालिका ‘तू तेव्हा तशी’ एका गोड टर्निंग पॉइंटवर आहे. या मालिकेतील वयाच्या चाळीशीनंतर आयुष्यात येणारं प्रेम, त्यातील अडथळे, त्यातून फुलणारं नातं आणि अखेरीस सेकंड इनिंग. हे सगळंच कसं वेगळ्या नजरेतून दर्शवलं आहे.
मालिकेतील सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित हि दोन पात्र वयाच्या एका विशेष टप्प्यावर आयुष्यातील जोडीदाराची कमी बनहरुन काढण्यास सज्ज आहेत. बरीच लोक त्यांच्या प्रेमाला समर्थन देत आहेत तर बरीच लोक त्यांचं नातं तोडण्यात व्यस्त आहे. त्यामुळे मालिकेत एक वेगळाच मसाला आहे जो प्रेक्षकांना आवडतोय. आज रविवारी मालिकेचा एक विशेष भाग आहे ज्यामध्ये मालिकेतील कलाकार नटून थटून एक मजेशीर गाणं आपल्या भेटीला घेऊन येत आहे.
सध्या या मालिकेला एक नवीन वळण मिळणार आहे. अनामिका- सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच आता रविवारच्या एक तासाच्या विशेष भागामूळे आणखीच रंगात येणार आहे. या विशेष भागात एक खूप मजेदार असं गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या गाण्यात नकारात्मक भूमिकेत असलेली वल्ली सुद्धा मनसोक्त आनंद लुटताना दिसणार आहे. मालिकेतील सर्वच कलाकार या गाण्यात अगदी नटून थटून ठेका धरताना दिसणार आहेत.
या मजेदार गाण्याची शब्द रचना… ‘धिंगाणा, गोंधळ आता लग्नाआधीच गं.. जाऊबाई नांदायला आता येणार घरात गं’ अशी काहीशी आहे. अतिशय लक्षवेधी आणि मधुर हे गाणं आहे. याची शब्द रचना आणि संगीत हे कुणाल करण यांचं आहे. तर हे गाणं कुणाल करण आणि सागरिका जोशी यांनी गायलंय. या गाण्याचं दिग्दर्शन महाबलेश्वर नार्वेकर यांनी केलंय. आज रविवारी एक तासाच्या विशेष भागात हे गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण हा सोहळा हे गाणं कशासाठी याच कारण मात्र हा महाएपिसोड पाहिल्यावरच कळेल.
या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका एकत्र आल्या आहेत हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल. शिवाय गाण्यात चंदू चिमणा चिमणीचीही जोडी आहे आणि अगदी नील, राधा, माई मावशी, सचिन असे सगळेच या गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक भारी सरप्राईज देणार आहेत. पण हे सरप्राईज आहे तरी काय…? हे जाणून घ्यायचं आहे तर ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेचा आज रविवारी ३१ जुलै २०२२ रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता एक तासाचा विशेष भाग आपल्या झी मराठी वाहिनीवर पहायला विसरू नका.
Discussion about this post